जॅकलीन-सूरजला करायचंय एकत्र काम !
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2016 21:23 IST2016-02-19T04:23:55+5:302016-02-18T21:23:55+5:30
अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीस आणि सूरज पांचोली यांनी नुकतेच एका म्युझिक व्हिडिओमध्ये काम केले असून त्यांना म्हणे आता एकत्र चित्रपटात काम करायचे आहे. याविषयी जॅकलीन म्हणते

जॅकलीन-सूरजला करायचंय एकत्र काम !
अ िनेत्री जॅकलीन फर्नांडीस आणि सूरज पांचोली यांनी नुकतेच एका म्युझिक व्हिडिओमध्ये काम केले असून त्यांना म्हणे आता एकत्र चित्रपटात काम करायचे आहे. याविषयी जॅकलीन म्हणते,‘ मला असे वाटते की, आम्ही सोबत चांगल्याप्रकारे काम करू शकू. खरंच हे खुप मस्त आहे. त्याने माझ्यासोबत देखील खुप रिहर्सल केल्या. नंतर आम्ही रेमो डिसूजाच्या स्टूडिओत गेलो. जेव्हा तुम्ही एकमेकांसोबत काम करता तेव्हा तुम्हाला एकमेकांच्या चुका कळू लागतात. तो खरंच खुप हार्डवर्क करतो. ’ ‘जी एफ बी एफ’ हे गाणे गुरिंदर सेगल यांनी कम्पोज केले असून या व्हिडिओसाठी त्यांनी सकाळी ६ वाजेपर्यंत काम केले आहे. या गाण्यासाठीची संपूर्ण टीमच अत्यंत उत्तम होती, असे सूरज पांचोलीने सांगितले.