​ ‘जुडवा2’मध्ये अशी दिसणार जॅकलिन फर्नांडिस!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2017 14:16 IST2017-04-30T08:46:38+5:302017-04-30T14:16:38+5:30

श्रीलंकन ब्युटी जॅकलिन फर्नांडिस सध्या नको इतकी बिझी आहे. जॅकलिनने अनेक चित्रपट साईन केले आहेत. करण जोहरचा ‘ड्राईव’, ‘जुडवा2’, ...

Jacqueline Fernandez looks like this in Twilight! | ​ ‘जुडवा2’मध्ये अशी दिसणार जॅकलिन फर्नांडिस!

​ ‘जुडवा2’मध्ये अशी दिसणार जॅकलिन फर्नांडिस!

रीलंकन ब्युटी जॅकलिन फर्नांडिस सध्या नको इतकी बिझी आहे. जॅकलिनने अनेक चित्रपट साईन केले आहेत. करण जोहरचा ‘ड्राईव’, ‘जुडवा2’, ‘रिलोड’ असे अनेक चित्रपट जॅकलिनच्या हातात आहेत. यातील ‘जुडवा2’चे शूटींग जोरात सुरु आहे. तेही एका वेगळ्या लूकसह. होय, जॅकलिन या चित्रपटात एका आगळ्या-वेगळ्या अवतारात दिसणार आहे. सध्या लंडनमध्ये या चित्रपटाचे शूटींग सुरु आहे. या सेटवरचा एक फोटो जॅकने सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात जॅक सिल्व्हर शॉर्ट हेअरमध्ये दिसतेय. ‘मी ट्रार्इंग टू बी प्रोडक्टिव्ह...’ असे तिने सोशल मीडियावर हा फोटो शेअर करताना लिहिले आहे. हा नवा लूक ‘जुडवा2’चा आहे, हे जॅकने या कॅप्शनमध्ये लिहिलेले नाही. पण जॅकचा मेकअप आर्टिस्ट शान मुत्तथिल याने मात्र याबद्दल खुलासा केला आहे. जॅकचा हा लूक ‘जुडवा2’मधील आहे, असे त्याने सांगितले आहे. जॅकचा हा लूक तुम्हाला कसा वाटला, ते खालील कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहा.

ALSO READ : जस्टीन बीबरला मुंबईची सैर घडवणार जॅकलिन फर्नांडिस!

जॅकलिन सध्या जस्टीन बीबरच्या इंडिया टूरमुळे चर्चेत आहे. जस्टीनच्या मुंबई टूरदरम्यान जॅकलिन त्याची गाईड बनणार असल्याची खबर आहे. अलीकडे जॅकने सलमान खानच्या प्रॉडक्शन हाऊसचा चित्रपट नाकारल्याची चर्चा होती.जॅकच्या या नकारामागचे कारण काय तर डेट्स. होय, जॅकलिन सध्या प्रचंड बिझी आहे इतकी की, तिच्याकडे अजिबात डेट्स नाहीत. त्यामुळे मनाविरूद्ध तिला सलमानच्या चित्रपटाला नकार द्यावा लागला. सलमानचा ‘जुगलबंदी’ हा चित्रपट लवकरच फ्लोरवर येणार आहे. या चित्रपटात जॅक असावी, अशी सलमानची इच्छा होती. पण जॅकलिनने आधीच अनेक चित्रपट साईन केले आहेत. 
 

 

Web Title: Jacqueline Fernandez looks like this in Twilight!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.