​जॅकलिन फर्नांडिसने अशा हॉट अंदाजात केले नव्या वर्षाचे स्वागत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2018 15:59 IST2018-01-02T10:29:20+5:302018-01-02T15:59:20+5:30

बॉलिवूडच्या हॉट अभिनेत्रींपैकी एक जॅकलिन फर्नांडिस सध्या नव्या वर्षाच्या सेलिब्रिशनमध्ये बिझी आहे. बाली येथे जॅक सुट्टी घालवतेय. याचठिकाणचे जॅकचे ...

Jacqueline Fernandes welcomed the new year in such a hot endeavor! | ​जॅकलिन फर्नांडिसने अशा हॉट अंदाजात केले नव्या वर्षाचे स्वागत!

​जॅकलिन फर्नांडिसने अशा हॉट अंदाजात केले नव्या वर्षाचे स्वागत!

लिवूडच्या हॉट अभिनेत्रींपैकी एक जॅकलिन फर्नांडिस सध्या नव्या वर्षाच्या सेलिब्रिशनमध्ये बिझी आहे. बाली येथे जॅक सुट्टी घालवतेय. याचठिकाणचे जॅकचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये जॅक कमालीची बोल्ड दिसतेय. काही ठिकाणी ती मित्रांसोबत एन्जॉय करताना दिसतेय. तिचे हे हॉट फोटो चाहत्यांना चांगलेच भावले आहेत. एक दिवसात या फोटांना सात लाखांवर लाईक्स मिळाले आहेत.  



२००९ मध्ये ‘अलादीन’मधून बॉलिवूड डेब्यू करणारी ही श्रीलंकन सुंदरी आजघडीला एक आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.



जॅक सोशल मीडियावर कमालीची अ‍ॅक्टिव्ह आहे. इन्स्टाग्रामवर तिचे १.६ कोटी फॉलोअर्स आहेत. जॅकने आत्तापर्यंत याठिकाणी स्वत:चे १६०० पेक्षा अधिक फोटो पोस्ट केले आहेत.




जॅकलिनने आत्तापर्यंत ‘हाऊसफुल’,‘जुडवा’, ‘रेस’च्या फ्रेंचाइजीमध्ये काम केलेय. लवकरच जॅकलिन हॉलिवूड चित्रपटात दिसणार अशीही खबर आहे. खुद्द जॅकने याबाबत खुलासा केला आहे.   ‘जुडवा-२’मध्ये झळकलेली जॅकलीन सध्या ‘रेस-३’मध्ये सुपरस्टार सलमान खान याच्यासोबत काम करीत आहे. त्याचबरोबर ‘ड्राइव’मध्ये ती सुशांत सिंग राजपूतच्या अपोझिट दिसणार आहे.



मॉडेल म्हणून करिअरला सुरुवात करणा-या जॅकने २००६ मध्ये मिस युनिव्हर्स श्रीलंकाचा किताब जिंकला आणि पुढे ती बॉलिवूडमध्ये आली. २००९ मध्ये जॅक एका मॉडेलिंग शोसाठी  भारतात आली आणि इथलीच होऊन गेली.  अमिताभ बच्चन आणि रितेश देशमुख यांच्या ‘अलादिन’ या चित्रपटासाठी तिने आॅडिशन दिली आणि  हा चित्रपट तिला मिळाला.
 जॅकलिन श्रीलंकेची नागरिक असली तरी तिचे कनेक्शन अनेक देशांशी राहिले आहे. याचाच परिणाम म्हणजे, इंग्लिश, स्पॅनिश, फ्रेंच, अरबी आणि हिंदी या भाषा तिला अवगत आहेत. हॉलिवूड अभिनेत्री बनण्याचे जॅकचे स्वप्न होते. पण कदाचित जॅकच्या नशिबात काही वेगळेच लिहिले होते. हॉलिवूडऐवजी ती बॉलिवूडची अभिनेत्री झाली.

Web Title: Jacqueline Fernandes welcomed the new year in such a hot endeavor!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.