जॅकने केले सावध; वरूणपासून सावध राहा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2016 17:45 IST2016-10-15T17:45:19+5:302016-10-15T17:45:19+5:30
श्रीलंकन ब्युटी जॅकलिन फर्नांडिस हिने तिच्या सर्व चाहत्यांसाठी एक अलर्ट जारी केला आहे. सुरक्षित राहायचे तर वरूण धवनपासून दूर ...

जॅकने केले सावध; वरूणपासून सावध राहा!
>श्रीलंकन ब्युटी जॅकलिन फर्नांडिस हिने तिच्या सर्व चाहत्यांसाठी एक अलर्ट जारी केला आहे. सुरक्षित राहायचे तर वरूण धवनपासून दूर राहा, असे तिने म्हटले आहे. हा जॅकने हा अलर्ट का जारी केला, ते आम्ही तुम्हाला सांगतो. जॅकलिनने इन्स्टाग्रामवर वरूणसोबतचा तिचा एक फोटो शेअर केला आहे. यात वरूणने जॅकची वेणी त्याच्या दातात पकडलीय आणि जॅक त्याच्याकडे आश्चर्यचकित नजरेने बघून हसतेय. वरूण असे काही करणार, असे खुद्द जॅकलाही वाटले नसावे,असेच या फोटोवरून वाटते. या फोटोच्या माध्यमातून वरूणच्या जॅकने फीमेल फॅन्सला केसांची काळजी घेण्याची टिप दिली आहे. ‘वरूणला जवळ येऊ देऊ नका. जनहितार्थ जारी’, असे तिने लिहिलेयं.