​‘जब वी मेट’ची दशकपूर्ती ! असे झाले होते शूटींग!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2017 14:40 IST2017-10-26T09:10:18+5:302017-10-26T14:40:18+5:30

दहा वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी म्हणजे २६ आॅक्टोबरला ‘जब वी मेट’ हा चित्रपट रिलीज झाला होता. आज या चित्रपटाला दहा ...

'Jab We Met' Decade! It was shot !! | ​‘जब वी मेट’ची दशकपूर्ती ! असे झाले होते शूटींग!!

​‘जब वी मेट’ची दशकपूर्ती ! असे झाले होते शूटींग!!

ा वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी म्हणजे २६ आॅक्टोबरला ‘जब वी मेट’ हा चित्रपट रिलीज झाला होता. आज या चित्रपटाला दहा वर्षे पूर्ण झालीत. या चित्रपटाने मुलींना स्वत:वर प्रेम करणे शिकवले होते. ‘मैं अपनी फेवरेट हंू,’ असे मुली या चित्रपटानंतर म्हणायला लागल्या. करिना कपूर आणि शाहिद कपूर या एकेकाळच्या लव्हबर्ड्सचा हा चित्रपट तुफान गाजला होता. यातील चुलबुली गीत आणि साधा-भोळा आदित्य आजही सिनेप्रेमींच्या मनात जिवंत आहेत.  कदाचित म्हणूनच आज दहा वर्षांनंतरही हा चित्रपट पाहावासा वाटातो. यामुळेच ‘जब वी मेट’ हा इम्तियाज अलीच्या सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक आहे,  . गत दहा वर्षांत हा चित्रपट तुम्ही अनेकदा पाहिला असेल. पण खरे सांगायचे तर हा चित्रपट जितका मजेदार होता, तितकाच या चित्रपटाचे पडद्यामागचे शूटींगही मजेदार होते. आज ‘जब वी मेट’ला दहा वर्षे पूर्ण झाल्याच्या मुहूर्तावर या चित्रपटाच्या पडद्यामागच्या काही आठवणी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत, त्यावर एक नजर...





 या चित्रपटासाठी करिना कपूरला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. या चित्रपटाचे बहुतांश शूटींग हिमाचल प्रदेश व आजूबाजूच्या भागात झाले होते.



शूटींगदरम्यान आपल्या ओके झालेल्या शॉटवर एक नजर टाकताना शाहिद कपूर व करिना कपूर या फोटोत दिसत आहेत. सोबत चित्रपटाचा दिग्दर्शक इम्तियाज अलीही दिसतोय.



या फोटोत करिना कपूर काहीशी चिंतातूर दिसतेय. याऊलट शाहिद कपूरच्या चेहºयावर काहीसे खट्याळ भाव आहेत आणि इम्तियाजने आपले सगळे लक्ष करिनावर केंद्रित केले आहे. मला हा शॉट असाच हवा, कदाचित हे तो करिनाना पटवून देत असावा.



अशाच एका फोटोत गीत साकारणारी करिना कपूर आणि सोबत इम्तियाज अली.



या चित्रपटाची कोरिओग्राफर होती सरोज खान. शाहिद व करिनाला तिने असे काही तयार केले होते.



हा फोटो पाहून ही कुठल्या सीनची तयारी आहे, हे तुम्हाला कळले असेलच. होय, पाण्यात उडी मारण्याचा सीन.



‘जब वी मेट’चे शूटींग सुरु असताना करिनाची लाडकी बहीण करिश्मा कपूर आणि तिची मुलगी समायरा यांनी सेटला भेट दिली होती.

ALSO READ: ​छोटा नबाव तैमूर अली खानचे दर्शन होणार दुर्मिळ! सैफ व करिनाने घेतला मोठा निर्णय!!



Web Title: 'Jab We Met' Decade! It was shot !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.