Jab Harry Met Sejal mini trail 2 : अन् सेजल करते हॅरीची बोलती बंद!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2017 12:54 IST2017-06-19T07:23:12+5:302017-06-19T12:54:46+5:30
काल चॅम्पियन ट्राफीच्या भारत -पाकिस्तान फायनल क्रिकेट सामन्यावेळी शाहरूखने ‘जब हॅरी मेट सेजल’ पहिला मिनी ट्रेलर रिलीज केला होता. यानंतर आज दुसरा मिनी ट्रेलर रिलीज करण्यात आला.

Jab Harry Met Sejal mini trail 2 : अन् सेजल करते हॅरीची बोलती बंद!
श हरूख खान सध्या आपल्या ‘जब हॅरी मेट सेजल’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी शाहरूखने एकदम हटके तंत्र अवलंबले आहे. होय, शाहरूख ‘जब हॅरी मेट सेजल’चा ट्रेलर नाही तर मिनी ट्रेलर रिलीज करतो आहे. काल चॅम्पियन ट्राफीच्या भारत -पाकिस्तान फायनल क्रिकेट सामन्यावेळी शाहरूखने ‘जब हॅरी मेट सेजल’ पहिला मिनी ट्रेलर रिलीज केला होता. यानंतर आज दुसरा मिनी ट्रेलर रिलीज करण्यात आला. पहिल्या ट्रेलरमध्ये, मी एक चीप व्यक्ती आहे. मुलींना वाईट नजरेने बघतो, असे शाहरूख अनुष्काला म्हणत असल्याचे आपण पाहिले होते. आता या दुस-या मिनी ट्रेलरमध्ये अनुष्का शाहरूखला एक इंडेमनिटी बॉन्ड साईन करायला देते, असे दाखवले गेले आहे. आपल्यात कुठल्याही प्रकारचे सेक्सुअल इंटरअॅक्शन झाले तर त्याला पूर्णपणे तू जबाबदार असशील, असे या बॉन्डमध्ये लिहिलेले आहे. अनुष्काचे हे शब्द ऐकून ‘पंजाबी मुंडा’ शाहरूखला काय बोलावे, नि काय नाही, हेच सूचत नाही. त्याच्याकडचे शब्दच जणू संपतात. एकंदर काय तर हा मिनी ट्रेलर बघणे निश्चितपणे मजेशीर आहे.
ALSO READ : ‘जब हॅरी मेट सेजल’चा पहिला मिनी ट्रेलर आला!
सलमान खानच्या ‘ट्यूबलाईट’सोबत ‘जब हॅरी मेट सेजल’चा संपूर्ण ट्रेलर रिलीज होणार आहे. ‘जब हॅरी मेट सेजल’च्या निमित्ताने प्रथमच शाहरूख खान, अनुष्का शर्मा व इम्तियाज अली एकत्र आले आहेत. शाहरूखला या वर्षांत एका हिटची गरज आहे. त्यामुळे शाहरूखला या चित्रपटाकडून ब-याच अपेक्षा आहेत. आता त्याच्या या अपेक्षा किती पूर्ण होतात, ते आपण लवकरच बघणार आहोत. तोपर्यंत ‘जब हॅरी मेट सेजल’चा हा दुसरा मिनी ट्रेलर तुम्ही नक्कीच पाहायला हवा.