​जबरा फॅन हो गया !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2016 17:33 IST2016-07-14T10:32:30+5:302016-07-14T17:33:17+5:30

आगामी '24 सीझन-2' च्या प्रमोशनमध्ये सध्या अभिनेता अनिल कपूर बिझी आहे. नुकतंच त्यानं याचं प्रमोशन मुंबईतल्या मुंबई सेंट्रल स्थानकातून ...

Jab is a fan! | ​जबरा फॅन हो गया !

​जबरा फॅन हो गया !

ामी '24 सीझन-2' च्या प्रमोशनमध्ये सध्या अभिनेता अनिल कपूर बिझी आहे. नुकतंच त्यानं याचं प्रमोशन मुंबईतल्या मुंबई सेंट्रल स्थानकातून ट्रेन प्रवास करत केला. मात्र त्यावेळी अनिल कपूरचा त्याच्या क्रेझी फॅनशी आमनासामना झाला.सिनेस्टार आणि त्यांच्या क्रेझी फॅन्सच्या कथा आपण वारंवार ऐकतो, वाचतो आणि पाहतोसुद्धा. या स्टार्सच्या फॅन्सच्या क्रेझीनेसच्या नाना त-हा तुम्हालाही आश्चर्यचकीत करतील.


 
आता हेच पहा अभिनेता अनिल कपूर त्याच्या '24 सीझन-2' च्या प्रमोशनसाठी मुंबई सेंट्रल स्टेशनवर अवतरला. त्यावेळी खुद्द अनिल स्टेशनवर आल्याचं कळताच त्याची एक झलक पाहण्यासाठी त्याच्या फॅन्सची एकच झुंबड उडाली.
 


अनिलची एक झलक पाहता यावी आणि त्याचा एक फोटो आपल्या मोबाईलमध्ये कैद करता यावा यासाठी एक फॅन मात्र जीवाची पराकाष्टा करत होता.तो कधी पत्र्यावर चढला तर कधी भिंतीच्या कोप-यावर उभं राहून त्याची छबी कॅमे-यात कैद करण्याचा प्रयत्न करत होता.


 

या फॅनची धडपड अनिल कपूरच्याही नजरेस पडली. त्यानं त्याला थांबवण्याचा सल्ला दिला.. अशी तगमग करु नका असं जणू तो सांगू लागला.. अनिलनं त्याला खाली उतरण्याचाही सल्ला दिला.मात्र हा फॅन कुणाचंही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता.. खुद्द अनिलच्या विनवणीनंतरही त्याला फक्त अनिलचा फोटो आपल्या मोबाईलमध्ये कैद करणं महत्त्वाचं वाटत होतं.


 
मग अनिलनंच आपल्या या वेड्या आणि तितक्या क्रेझी फॅनला हात देत वर खेचलं. तेव्हा घडली एका जबरा फॅन आणि स्टारची भेट. यानंतर अनिल नक्कीच आपल्या स्टारला म्हणाला असेल.. एकदम झक्कास.

Web Title: Jab is a fan!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.