it’s sizzling : ​सुशांत सिंह राजपूतसोबत दिसली केंडल जेनर !!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2017 15:24 IST2017-05-03T09:24:35+5:302017-05-03T15:24:48+5:30

अखेर सुशांत सिंह राजपूत आणि सुपर मॉडेल व रिअ‍ॅलिटी स्टार केंडल जेनर याचे सिझलिंग फोटो उघड झालेच. होय, दहाव्या ...

It's sizzling: Kendal Jenner appeared with Sushant Singh Rajput !! | it’s sizzling : ​सुशांत सिंह राजपूतसोबत दिसली केंडल जेनर !!

it’s sizzling : ​सुशांत सिंह राजपूतसोबत दिसली केंडल जेनर !!

ेर सुशांत सिंह राजपूत आणि सुपर मॉडेल व रिअ‍ॅलिटी स्टार केंडल जेनर याचे सिझलिंग फोटो उघड झालेच. होय, दहाव्या वर्धापनदिनी ‘वोग इंडिया’ मे महिन्याचा विशेष अंक काढला आहे. यात सुशांत सिंह राजपूत, कॅटरिना कैफ आणि केंडल जेनर यांचा जलवा तुम्ही पाहू शकला. ‘वोग इंडिया’च्या कव्हर पेजवर आहे, हॉट अ‍ॅण्ड ब्युटिफुल केंडल जेनर. केंडलचा हा कव्हर फोटो भारतात शूट केला गेला आहे. ‘वोग इंडिया’च्या आतल्या पानांवर सुशांत सिंह राजपूत आणि केंडल या दोघांची आयकॉनिक फोटो तुम्हाला पाहता येणार आहे. याशिवाय एकट्या सुशांतचा राजेशाही थाटही तुम्ही पाहू शकणार आहात.





मारियो टेस्टिनो या दिग्गज फोटोग्राफरने हे फोटोशूट केले आहे. मारियो एक जगप्रसिद्ध फोटोग्राफर आहे. आयकॉनिक रॉयल फोटोजसाठी त्याला ओळखले जाते. १९९७ मध्ये स्वर्गीय राजकुमारी डायना हिचे फोटो मारियोने काढले होते. यानंतर ड्यूक अ‍ॅण्ड डचिस आॅफ केंब्रिजचे विलियम आणि केट मिडिलटन या दोघांच्या साखरपुड्याचे फोटोही मारियोच्या कॅमेºयाने टिपले गेले होते.





मारिया टेस्टिनोने या फोटोशूटसाठी राजस्थानला पसंती दिली होती. गत फेबु्रवारीमध्ये अतिशय गुपचूपपणे हे फोटोशूट झाले होते. एकही फोटो लीक होऊ नये, यासाठी पूरेपूर खबरदारी घेतली गेली होती.





केंडल खास या फोटोशूटसाठी भारतात आली होती. या फोटोशूटचे रिझल्ट तुमच्यासमोर आहेत. केंडलचा हॉट अंदाज आणि सुशांतसोबतची तिची सिझलिंग केमिस्ट्री कशी वाटली, ते खालील कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. अर्थात सुशांतची कथित गर्लफ्रेन्ड क्रिती सॅनन ही हर्ट होणार नाही, याची काळजी घ्या हं!!

Web Title: It's sizzling: Kendal Jenner appeared with Sushant Singh Rajput !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.