ईशाने स्वत:च उडवली साखरपुड्याची अफवा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2016 20:34 IST2016-04-11T00:36:54+5:302016-04-11T20:34:22+5:30
प्रसिद्धी आणि लाईमलाईटमध्ये राहण्यासाठी काहीही करणारे बॉलिवूडमध्ये अनेक आहेत. आता ईशा गुप्ताबद्दलही काहीसे असेच म्हणावे लागेल. गेल्या अनेक दिवसांपासून ...
.jpg)
ईशाने स्वत:च उडवली साखरपुड्याची अफवा
................................................................
ईशा गुप्ताचा साखरपुडा!!
बॉलिवूडच्या वेडिंग सिझनमध्ये आता अभिनेत्री ईशा गुप्ता हिचेही नाव जुळले आहे. ‘राज ३’ फेम ईशाने गुपचूप साखरपुडा उरकला आहे. खुद्द तिने आज सोशल मीडियावर याबाबतचे संकेत दिले. तीस वर्षांच्या ईशाने आपल्या साखरपुड्याची अंगठी दाखवणारा एक फोटो पोस्ट केला आहे. या अंगठीत एक मोठा हिरा जडलेला आहे. त्याने विचारले आणि मी हो म्हटले...असे कॅप्शन तिने याखाली लिहिले आहे. अर्थात ईशाचा मंगेतर कोण, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. ईशा ‘आय हेट लव्ह स्टोरी’चा दिग्दर्शक पुनित मल्होत्रा याच्यासोबत डेट करीत असल्याच्या बातम्या याआधी चर्चेत होत्या. आता ईशाच्या बोटात हिºयाची अंगठी घालणारा पुनितच की आणखी कुणी, हे लवकरच कळेलच...तोपर्यंत वेट अॅण्ड वॉच!!