इट्स रॅप अप फॉर ‘झूझू’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2016 15:53 IST2016-12-14T15:52:46+5:302016-12-14T15:53:04+5:30

सुपरस्टार सलमान खान आणि चिनी कलाकार ‘झूझू’ यांच्या मुख्य भूमिकेतील ‘ट्यूबलाईट’ चित्रपटाची शूटिंग सध्या सुरू आहे. तुम्हाला तर माहिती ...

It's Rap Up For 'Jhuzhu'! | इट्स रॅप अप फॉर ‘झूझू’!

इट्स रॅप अप फॉर ‘झूझू’!

परस्टार सलमान खान आणि चिनी कलाकार ‘झूझू’ यांच्या मुख्य भूमिकेतील ‘ट्यूबलाईट’ चित्रपटाची शूटिंग सध्या सुरू आहे. तुम्हाला तर माहिती आहे की, अभिनेत्री झूझू ही या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करत आहे. दिग्दर्शक कबीर खान चित्रपटाच्या शूटिंगपासून सेटवरील फोटो सातत्याने शेअर करत असतो. त्याने नुकताच झूझू सोबतचा एक फोटो शेअर करून तिचे चित्रपटासाठीचे शूटिंग संपल्याचे चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून कळवले आहे. 

‘बजरंगी भाईजान’ दिग्दर्शक कबीर खान आणि सलमान खान ही जोडी ‘ट्यूबलाईट’ च्या निमित्ताने पुन्हा एकदा चर्चेत आलीय. मध्यंतरी त्यांच्यामध्ये सेटवर भांडणे होत असल्याच्या बातम्या येऊन धडकल्या. तेव्हा मात्र, त्यांच्या फॅन्सनी सोशल मीडियावर अनेक कमेंट्स केल्या. ही जोडी आम्हाला अशीच निरंतर पाहायची असल्याचे त्यांनी संदेशांवरून सुचित केले. त्यांच्यात वाद सुरू होते या बातमीत कितपत तथ्य होते, हे माहित नाही. पण, आता ते दोघे पूर्ववत मित्र झाल्याचे कळतेय. 

मनालीत शूटिंग सुरू झाले तेव्हापासून चित्रपट चर्चेत आहे. तेथील शूटिंग सल्लूमियाँसाठी अविस्मरणीय ठरले. त्याचा भाचा अहील, बहीण अर्पिता कुटुंबिय त्याला भेटण्यासाठी सेटवर आले होते. कबीर खान दिग्दर्शित ‘बजरंगी भाईजान’ ने बॉक्स आॅफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. आता अशीच अपेक्षा कबीर-सलमान या दोघांनाही चित्रपटाकडून लागली आहे. 

Web Title: It's Rap Up For 'Jhuzhu'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.