IT'S CONTROVERSIAL: निया शर्माला सोशल मीडियावर का पडत आहेत पुन्हा शिव्या?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2017 14:13 IST2017-02-16T08:41:07+5:302017-02-16T14:13:42+5:30

आता तुम्ही म्हणाल की, तिने पूर्वीप्रमाणे एखाद्या बोल्ड व्हिडिओ पोस्ट केला का? तर नाही. तिने तर एका लहान मुलाचा व्हिडिओ शेअर केला. यामध्ये तिच्या जवळच्या मैत्रीणीचा चार-पाच वर्षांचा मुलगा शिव्या देतोय.

IT'S CONTROVERSIAL: Why is Naya Sharma facing social media again? | IT'S CONTROVERSIAL: निया शर्माला सोशल मीडियावर का पडत आहेत पुन्हा शिव्या?

IT'S CONTROVERSIAL: निया शर्माला सोशल मीडियावर का पडत आहेत पुन्हा शिव्या?

या शर्मा आणि वाद यांचे जणू काही अतूट नाते आहे. अधूनमधून ती कोणत्या ना कोणत्या वादात अडकत असते. खासकरून तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे तर तिला नेटिझन्सच्या रोषाला सामोरे जावे लागते. बेधडक नियाला याचा काही फरक पडत नसल्याचे दिसतेय.

नुकतेच तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आणि लोक तिला शिव्या घालू लागले. आता तुम्ही म्हणाल की, तिने काही पूर्वी प्रमाणे एखाद्या बोल्ड व्हिडिओ पोस्ट केला का? तर नाही. तिने तर एका लहान मुलाचा व्हिडिओ शेअर केला. मग लोकांना एवढे चीडण्याचे कारण काय?

आहो, या व्हिडिओमध्ये तिच्या जवळच्या मैत्रीणीचा चार-पाच वर्षांचा मुलगा शिव्या देतोय. आश्चर्य वाटले ना? बोल्ड आणि मनात येईल ते ठामपणे मांडणाऱ्या नियाला तिचे फॉलोवर्स तिच्या बेधडकपणासाठी लाईक करतात. मात्र एखाद्या लहान मुलाचा असा शिव्या देणारा व्हिडिओ पोस्ट करून तिने अनेकांची नाराजी ओढावून घेतली.
 

इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर करताना तिने कॅप्शन दिली की, ‘मला असे खोडकर मुले खूप आवडतात. मला तर विश्वासच बसत नाहीए की, मी या मुलाची मावशी आहे. माझ्या बेस्ट फ्रेंडचा मुलगा एवढा मोठा झाला हे पाहून खूप आनंद होतोय. (त्याच्या शिव्यांकडे दुर्लक्ष करा!)’

नेटिझन्सनी कॉमेंट करून तिला चांगलेच खडसावले की, ‘तुला लाज कशी नाही वाटली हा व्हिडिओ टाकताना’, ‘या लहान मुलाला अशा वादामध्ये ओढण्याची काय गरज होती?’,‘अत्यंत घाणेरडा प्रकार आहे हा’, ‘सवंग प्रसिद्धीसाठी एवढ्या खालच्या पातळीवर जायला नको होते’. अशा काही कॉमेंट्स या पोस्टवर पडत आहे.

याच महिन्याच्या सुरूवातीला तिने फोटोशूट दरम्यानचा एकदम हॉट व्हिडिओ शेअर केला होता. सोशल मीडियावर टीकेची झोड उठल्यावर तिने खडसावून सांगितले की, तुम्ही किती नाव ठेवले तरी मी असे व्हिडिओ शेअर करीतच राहणार. तिच्या अशा उत्तराचे खूप कौतूकही झाले.

ALSO READ: ​सेक्सी फोटोशूटला नाव ठेवणाऱ्यांना निया शर्माने केले ‘खामोश’!

Web Title: IT'S CONTROVERSIAL: Why is Naya Sharma facing social media again?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.