its confirmed - ठग्स ऑफ हिंदुस्तानमध्ये आमिरसोबत दिसणार फातिमा सना शेख

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2017 17:46 IST2017-05-05T10:29:07+5:302017-05-05T17:46:10+5:30

आमिर खान यशराज फिल्म्सच्या ठग्स ऑफ हिंदुस्तान या चित्रपटात आपल्याला दिसणार आहे. याचित्रपटात त्याच्यासोबत कोण अभिनेत्री असणार याबाबत बरीच ...

Its confirmed - Fatima Sana Sheikh appears with Amir in the Thugs of Hindustan | its confirmed - ठग्स ऑफ हिंदुस्तानमध्ये आमिरसोबत दिसणार फातिमा सना शेख

its confirmed - ठग्स ऑफ हिंदुस्तानमध्ये आमिरसोबत दिसणार फातिमा सना शेख

िर खान यशराज फिल्म्सच्या ठग्स ऑफ हिंदुस्तान या चित्रपटात आपल्याला दिसणार आहे. याचित्रपटात त्याच्यासोबत कोण अभिनेत्री असणार याबाबत बरीच चर्चा रंगली होती. कॅटरिना कैफ, कृति सेनन, आलिया भट्ट आणि श्रद्धा कपूर यांची नाव चर्चेत होती. सगळ्यांचा हातून हा 400 कोटींचा चित्रपट निघून गेला आहे. यात बाजी मारली ती दंगल गर्ल फातिमा सना शेखने. होय, तुम्ही अगदी बरोबर वाचलात आमिरच्या अपोझिटला आपल्याला फातिमा शेख पाहायला मिळमार आहे. अमिताभ बच्चन आणि आमिर खान स्टारर या चित्रपटात फातिमा शेख ही आता असणार आहे. 

 काहि दिवसांपूर्वी फामिताने या भूमिकेसाठी लूक टेस्ट पण दिला होता. ज्यात ती ब्लॅक कलरच्या ड्रेसमध्ये योद्धासारखी दिसते आहे. ठॅग्स ऑफ हिंदुस्तानचे दिग्दर्शन विजय कृष्णा आचर्या करत आहेत. याचित्रपटाची शूटिंग 1 जून 2017 सुरु होणार आहे. हा चित्रपट 2018च्या दिवाळीच्या आसपास प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याचित्रपट अभिनेत्रीच्या भूमिकापण महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे या भूमिकेत परफेक्ट बसेल अशा अभिनेत्रीच्या आम्ही शोधात होतो. या भूमिकेसाठी आम्ही ऑडिशन आणि वर्कशॉप घेतले यातून फातिमाची निवड करण्यात आल्याची दिग्दर्शकांने सांगितले आहे.  फातिमाने दंगलमध्ये गीता फोगटची भूमिका साकारली होती. 

चित्रपटात बिग बी अमिताभ बच्चन आमिर खानच्या वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहेत. अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्यासाठी आमिर खान उत्साहित आहे. आमिरचे म्हणणे आहे त्या सगळे लक्ष या चित्रपटावर केंद्रीत केले आहे. त्यामुळे दुसरा कोणताच चित्रपट त्यांने साईन केला नाही. या चित्रपटाकडून बॉलिवूडला खूप अपेक्षा आहेत.  

Web Title: Its confirmed - Fatima Sana Sheikh appears with Amir in the Thugs of Hindustan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.