ड्रग्ज प्रकरणात आयटम गर्ल मुमैथ खानची एसआयटीकडून चौकशी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2017 18:30 IST2017-07-29T13:00:56+5:302017-07-29T18:30:56+5:30
हैदराबाद ड्रग्ज रॅकेट प्रकरणात तेलंगनाच्या अबकारी विभाग आणि विशेष तपास पथकाने (एसआयटी) गुरुवारी आयटम गर्ल तथा अभिनेत्री मुमैथ खान ...
.jpg)
ड्रग्ज प्रकरणात आयटम गर्ल मुमैथ खानची एसआयटीकडून चौकशी!
ह दराबाद ड्रग्ज रॅकेट प्रकरणात तेलंगनाच्या अबकारी विभाग आणि विशेष तपास पथकाने (एसआयटी) गुरुवारी आयटम गर्ल तथा अभिनेत्री मुमैथ खान हिची कसून चौकशी केली. एसआयटी विभागाच्या चार सदस्यीय अधिकाºयांनी मुमैथला अबकारी विभागाच्या कार्यालयात सकाळी १० वाजता बोलाविले होते. मुमैथचे ड्रग्ज रॅकेटचा म्होरक्या केल्विन मास्करेनहास याच्यासोबत संबंध असल्याचा एसआयटीला संशय आहे. याच अनुषंगाने मुमैथची कसून चौकशी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्याचबरोबर ती ड्रग्जचे सेवन करते काय? याबाबतही तिला विचारण्यात आल्याचे समजते.
ALSO READ : Shocking : ड्रग्ज प्रकरणात आयटम गर्ल मुमैत खानची एसआयटी करणार चौकशी!
सध्या मुमैथ ‘बिग बॉस’ या तेलगू रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झाली आहे. मात्र बिग बॉसच्या घरात प्रवेश करण्याअगोदरच तिला एसआयटीने समन्स बजावलेला असल्याने तिला एक दिवसाची परवानगी घेऊन बिग बॉसच्या घराबाहेर पडावे लागले. एसआयटीच्या चौकशीला सामोरे जाण्यासाठी ती मुंबई येथून हैदराबादला पोहोचली. शोच्या नियमानुसार कुठल्याही स्पर्धकाला जोपर्यंत तो स्पर्धेतून बाहेर होत नाही, तोपर्यंत त्याला घराबाहेर पडण्याची परवानगी नाही. मात्र मुमैथला काही अटी-शर्तींवर एक दिवसासाठी घराबाहेर पडण्याची परवानगी दिली.
![]()
तेलगू फिल्म इंडस्ट्रीमधील मुमैथ आठवी अशी सेलिब्रिटी आहे, तिला ड्रग्ज प्रकरणात एसआयटीसमोर हजर व्हावे लागले. दरम्यान, मुमैथ अगोदर याच प्रकरणात तपास अधिकाºयांनी बुधवारी अभिनेत्री चार्मी कौर हिची तब्बल सहा तास चौकशी केली. एसआयटीने सांगितले की, चार्मीने रक्त, केस आणि नखांचे नमुने देण्यास नकार दिल्याने तिच्याकडून अपेक्षित असलेली पुरेशी माहिती मिळू शकली नाही.
![]()
दरम्यान, या प्रकरणात आतापर्यंत १२ सेलिब्रिटींना समन्स बजावण्यात आले होते. या रॅकेटचा म्होरक्या केल्विन मास्करेनहास याच्या कॉल डाटामध्ये या सेलिब्रिटींचे कॉन्टॅक्ट नंबर मिळाल्यामुळेच ते चौकशीच्या फेºयात आले. अभिनेता रवि तेजा आणि अन्य काही लोकांचीही याच आठवड्यात चौकशी केली गेली. या प्रकरणात एसआयटीने आतापर्यंत २० संशयितांना अटक केली आहे. त्यांच्याकडून पुरेशी माहिती मिळाल्याचेही एसआयटीच्या अधिकाºयांनी सांगितले आहे.
![]()
या प्रकरणाला तेव्हा वळण आले जेव्हा गेल्या बुधवारी एसआयटीने एका डच नागरिकाला अटक केली. माइक कमिंग असे नाव असलेल्या या डच नागरिकाकडून एसआयटीला बरीचशी माहिती मिळण्याची शक्यता आहे. असा संशय व्यक्त केला जात आहे की, हा डच नागरिक युरोपमधून भारतात ड्रग्ज सप्लाय करीत होता. भारतात सक्रिय असलेल्या रॅकेटमध्ये त्याची महत्त्वाची भूमिका असून, तोच या प्रकरणातला सूत्रधार असण्याची शक्यता आहे.