विरह झाला असह्य! चेह-याला रूमाल बांधून अनुष्का शेट्टीला भेटायला पोहोचला प्रभास!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2018 15:07 IST2018-01-25T09:34:38+5:302018-01-25T15:07:13+5:30
‘बाहुबली2’पासून प्रभास व अनुष्का शेट्टी आॅनस्क्रीन जोडीच्या लिंकअपच्या बातम्या येत आहे. खरे तर आॅनस्क्रीन जोडी रिअल लाईफ जोडीत बदलावी, ...
.jpg)
विरह झाला असह्य! चेह-याला रूमाल बांधून अनुष्का शेट्टीला भेटायला पोहोचला प्रभास!!
‘ ाहुबली2’पासून प्रभास व अनुष्का शेट्टी आॅनस्क्रीन जोडीच्या लिंकअपच्या बातम्या येत आहे. खरे तर आॅनस्क्रीन जोडी रिअल लाईफ जोडीत बदलावी, अशी चाहत्यांची इच्छा आहे. पण अनुष्का व प्रभास मात्र काहीही सांगायला तयार नाही. आम्ही केवळ चांगले मित्र आहोत, यापलीकडे दोघांनीही खुलासा केलेला नाही. गेल्या अनेक दिवसांपासून अनुष्का व प्रभासच्या लिंकअपच्या बातम्या येत आहेत. दोघेही लग्न करणार, इथपर्यंत चर्चा रंगते आहे. काही दिवसांपूर्वी तर वेगळीच बातमी कानावर आली. अनुष्का म्हणे प्रभाससोबत कमालीची पसेसिव्ह झालीय. इतके कमी की काय म्हणून प्रभासचा फोन त्याने उचलण्याआधी अनुष्का उचलू लागलीय, अशी चर्चा रंगली. आता खरे काय नि खोटे काय, ते आम्हाला ठाऊक नाही. पण ताज्या बातमीने प्रभास व अनुष्काच्या लिंकअपच्या बातम्यांना पुन्हा हवा दिली आहे. होय, प्रभास अलीकडे अनुष्काच्या ‘भागमती’ या चित्रपटाच्या सेटवर दिसला. विशेष म्हणजे, कुणी ओळखू नये म्हणून प्रभास आपला चेहरा रूमालाने झाकून अनुष्काला भेटायला गेला. अर्थात इतके करूनही तो मीडियापासून लपू शकला नाही. या सेटवरचा त्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.
अलीकडे एका ताज्या मुलाखतीत खुद्द प्रभासला अनुष्कासोबतच्या लिंकअपबाबत प्रश्न विचारला गेला होता. हा प्रश्न ऐकून प्रभास गालातल्या गालात हसला होता. ‘मी व अनुष्का गेल्या ९ वर्षांपासून एकमेकांना ओळखतो. आम्ही खूप चांगले मित्र आहोत. आपल्या लिंकअपच्या बातम्या होऊ द्यायच्या नाहीत, हे आम्ही फार पूर्वीच ठरवले होते. पण या बातम्या येत राहिल्या आणि आता...? आता तर आमच्यात काही तरी आहे, असे मलाही वाटू लागले आहे,’ असे प्रभास यावर म्हणाला होता.
ALSO READ : ‘बाहुबली’ प्रभास कधी करणार लग्न? काकांनी केला खुलासा!
सध्या प्रभास ‘साहो’ या चित्रपटात बिझी आहे. यात प्रभासच्या अपोझिट दिसणार आहे ती श्रद्धा कपूर. या चित्रपटात प्रभास दमदार अॅक्शन करताना दिसणर आहे. विशेष म्हणजे या अॅक्शन सीन्ससाठी बॉडी डबल घेण्यास प्रभासने नकार दिला आहे. त्यामुळे प्रभास स्वत: सगळे स्टंट सीन्स करतोय.
#Prabhas Visited #Bhaagamathie Set pic.twitter.com/f5AqtfejJi— Rebel ★ Prabhas Fan (@PavanPrabhas__) January 24, 2018