नव्या लूकमध्ये धर्मेशला ओळखणंही झाले कठीण
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2016 17:10 IST2016-05-23T11:40:00+5:302016-05-23T17:10:00+5:30
डान्स इंडिया डान्स या मालिकेद्वारे प्रकाशझोतात आलेला धर्मेश येलंडे एबीसीडी आणि एबीसीडी २ या चित्रपटात झळकला होता. या चित्रपटानंतर ...

नव्या लूकमध्ये धर्मेशला ओळखणंही झाले कठीण
ड न्स इंडिया डान्स या मालिकेद्वारे प्रकाशझोतात आलेला धर्मेश येलंडे एबीसीडी आणि एबीसीडी २ या चित्रपटात झळकला होता. या चित्रपटानंतर तो आता बँजो या चित्रपटात काम करत आहे. बँजोमध्ये तो ड्रम वाजवणाऱ्या एका मुलाची व्यक्तिरेखा साकारणार आहे. आतापर्यंतच्या सगळ्याच चित्रपटात त्याने केवळ एका डान्सरची भूमिका साकारली होती. पण बँजोमधली त्याची भूमिका खूप वेगळी असणार आहे. तसेच या चित्रपटात त्याचा लूकही त्याच्या इतर चित्रपटांप्रमाणे खूप वेगळा असणार आहे. त्याला या लूकमध्ये ओळखणेही त्याच्या फॅन्ससाठी कठीण आहे.