14 वर्षांपूर्वी गौहर खानने केला होता 'या' दिग्दर्शकासोबत साखरपुडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2017 16:39 IST2017-09-07T11:07:21+5:302017-09-07T16:39:40+5:30

वर्ष 2012 मध्ये रिलीज झालेला चित्रपट इश्कजादे मधून उत्तम अभिनय सादर करत गौहर खानने बॉलिवूडकडे आपले लक्ष वेधून घेतले. ...

It was 14 years ago that Gauhar Khan had done 'This' with the director Sakharpuda | 14 वर्षांपूर्वी गौहर खानने केला होता 'या' दिग्दर्शकासोबत साखरपुडा

14 वर्षांपूर्वी गौहर खानने केला होता 'या' दिग्दर्शकासोबत साखरपुडा

्ष 2012 मध्ये रिलीज झालेला चित्रपट इश्कजादे मधून उत्तम अभिनय सादर करत गौहर खानने बॉलिवूडकडे आपले लक्ष वेधून घेतले. अभिनेत्रीसोबतच ती एक मॉडेल सुद्धा आहे. गौहरचा जन्म महाराष्ट्रात असलेल्या पुण्यातील एक मुस्लीम कुटुंबामध्ये 23 ऑगस्ट 1983 मध्ये झाला. गौहरने 2009मध्ये बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. रॉकेट सिंग, सेल्ममॅन ऑफ द इअर चित्रपटात गौहर दिसली होती. यानंतर 2011मध्ये आलेल्या गेम या अॅक्शन थ्रिलर चित्रपटात ही गौहर झळकली होती. त्याच बरोबर काही महिन्यांपूर्वी रिलीज झालेल्या ब्रदीनाथ की दुल्हनिया आणि बेगम जान चित्रपटात ही तिने आपला दर्जेदार अभिनय सादर केला आहे. गौहरने 2003 मध्ये दिग्दर्शक साजिद खानसोबत साखरपुडा केला आहे. असे आश्चर्यचकित होऊ नका आम्ही तुम्हाला सगळा सविस्तर प्रकार सांगतो.  

गौहर बिग बॉसच्या सातव्या सीजनमध्ये सहभागी झाली होती. त्यावेळी तिचे नाव कुशाल टंडनसोबत जोडले गेले होते. दोघांचे नातं फार काळ टिकू शकले नाही. मात्र त्यांच्या नात्याची बरीच चर्चा झाली होती. कुशालशी ब्रेकअप झाल्यानंतर तिचे नाव हर्षवर्धन राणेशी जोडले गेले होते. मात्र त्या दोघांनी आपल्या काहीही नसल्याचा खुलासा केला होता. या सगश्या चर्चा खोट्या असल्याचे स्पष्ट केले होते. गौहर मला आवडत नाही, असे मी अजिबात म्हणणार नाही. ती कष्टाळू आहे. आत्मसन्मान जपणारी मुलगी आहे. त्यामुळे तिच्याबद्दल माझ्या मनात कमालीचा आदर आहे. मात्र यापेक्षा आम्हा दोघांमध्ये काहीही नाही. आम्ही दोघेही परस्परांना डेट करीत असल्याची बातमी खोटी आहे, असा खुलासा हर्षवर्धनने केला होता. गौहरचे नाव फक्त कुशाल आणि हर्षवर्धनशी जोडले गेले नाहीतर याआधी सखारपुडासुद्धा केला होता.एका इंटरव्हु दरम्यान गौहरशी साखरपुडा केलेल्या साजिद खाननेच ही गोष्ट सांगितली होती. गौहर साजिदपेक्षा 12 वर्षांनी लहान आहे. 

Web Title: It was 14 years ago that Gauhar Khan had done 'This' with the director Sakharpuda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.