कपूर खानदानात पुन्हा एकदा सनई चौघडे वाजण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2017 10:05 IST2017-11-08T04:35:53+5:302017-11-08T10:05:53+5:30

करिश्मा कपूर आणि तिचा कथित बॉयफ्रेंड पुन्हा एकदा चर्चेत आला आहेत. मिळालेल्या बातमीनुसार  करिश्मा लवकरच पुन्हा एकदा विवाहबद्ध होणार ...

It is likely that Kapoor Khan will again play Chanchade again | कपूर खानदानात पुन्हा एकदा सनई चौघडे वाजण्याची शक्यता

कपूर खानदानात पुन्हा एकदा सनई चौघडे वाजण्याची शक्यता

िश्मा कपूर आणि तिचा कथित बॉयफ्रेंड पुन्हा एकदा चर्चेत आला आहेत. मिळालेल्या बातमीनुसार  करिश्मा लवकरच पुन्हा एकदा विवाहबद्ध होणार असल्याचे कळते. त्याला कारणही तसेच आहे. करिश्माचा कथित बॉयफ्रेंड संदीप तोष्णीवाल  याचा अखेर घटस्फोट झाला आहे. ७ वर्षाच्या लढाई नंतर त्याची पत्नी डॉक्टर अश्रिता पासून घटस्फोट मिळाला आहे  ते कायद्यानुसार आता वेगळे झाले आहे. यानंतर आता हिच चर्चा आहे की कपूर खानदानात पुन्हा एकदा सनई चौघडे वाजण्याची शक्यता आहे. कपूर खानदानने संदीपला आपला जावई म्हणून स्वीकारल्याच्याही चर्चा आहे. सोमवारी बांद्रा फॅमिली कोर्टने संदीप आणि अश्रिताच्या घटस्फोटाला  मान्यता दिली.  

कोटाच्या आदेशानुसार संदीप आणि आश्रिताच्या दोन्ही मुलींची कस्टडी अश्रिताकडे असेल.  ह्या दोन्ही मुलींच्या भविष्यासाठी संदीपला प्रत्येकी ३ कोटी देण्याचे ठरले आहे तसेच त्याच्या पत्नीला म्हणजेच अश्रिताला पोटगी म्हणून २ कोटी देणार. त्याचबरोबर दिल्लीमधील त्यांचे घर सुद्धा अश्रिताच्या नावावर असेल. सध्या अश्रिता मुबंईमध्ये राहाते आहे. संदीप आणि करिश्मा गेल्या ३ वर्षांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये आहेत. हे दोघे सारखे त्याच्या कुटुंबातील कार्यक्रमात आणि  इतरांच्या पार्टी मध्ये एकत्र दिसतात. मात्र त्या दोघांनी अजनूही हे नाते अधिकृत्यरित्या स्वीकारलेले नाही आहे. करिश्माचे  पाहिलेलग्न संजय कपूर बरोबर २००३ मध्ये झाले होते पण त्यांचे आपसात पटले नाही म्हणून त्यांनी वेगळे व्हायचा निर्णय घेतला. संजयने करिश्माने आपल्याशी फक्त पैशांसाठी लग्न केल्याचा गंभीर आरोप केला होता. संजय सोबत लग्नाच्या आधी करिश्मा कपूरची अभिषेक बच्चनसोबत साखरपुडा झाला होता. मागच्या वर्षी करिश्मा आणि संजय कपूरचा घटस्फोट झाला. संजय आणि करिश्माला दोन मुलं आहेत समायरा आणि कियानराज. घटस्फोटानंतर ही दोन्ही मुलं करिष्मा सोबत राहत आहेत. संजय आणि करिष्मा यांनी एकत्र 11 वर्ष संसार केला. तर संजय कपूरने  घटस्फोटानंतर प्रिया सचदेवाशी लग्न केले. 

Web Title: It is likely that Kapoor Khan will again play Chanchade again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.