इशांत शर्माचेही झाले शुभमंगल! बघा कोण कोण आले त्याच्या लग्नात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2016 15:50 IST2016-12-10T15:30:48+5:302016-12-10T15:50:11+5:30

भारतीय क्रिकेट संघातील जलद गोलंदाज इशांत शर्माची अखेर विकेट पडली. बास्केटबॉल खेळाडू प्रतिमा सिंग सोबत त्याचे शुक्रवारी लग्न झाले. ...

Ishant Sharma too Shubhamangal! Look who's at his wedding ... | इशांत शर्माचेही झाले शुभमंगल! बघा कोण कोण आले त्याच्या लग्नात...

इशांत शर्माचेही झाले शुभमंगल! बघा कोण कोण आले त्याच्या लग्नात...

रतीय क्रिकेट संघातील जलद गोलंदाज इशांत शर्माची अखेर विकेट पडली. बास्केटबॉल खेळाडू प्रतिमा सिंग सोबत त्याचे शुक्रवारी लग्न झाले. गुडगाव येथील फार्महाऊसवर पार पडलेल्या या विवाह सोहळ्याला क्रिकेटर महेंद्रसिंग धोनी आणि युवराज सिंगसह इतर अनेक सेलिब्रेटी व राजकीय नेत्यांनी हजेरी लावली. 

सुत्रांनुसार धोनीची पत्नी साक्षी व युवराजची नववधू हेझलकीच या दोघीदेखील लग्नाला आल्या नव्हत्या. इंग्लंड क्रिकेट संघासोबत सुरू असलेल्या टेस्ट सिरीजमुळे विराट कोहलीसह टीम प्लेयर्स इशांतच्या लग्नाला हजर नाही राहू शकले.

नवरदेव बनलेल्या इशांतने सोनरी व मरून रंगाची शेरवानी तर प्रतिमाने सोनरी छटा असलेला लेहंगा परिधान केला होता. 

इशांत आणि प्रतिमा दीर्घकाळापासून एकमेकांचे मित्र असून १८ जून रोजी त्यांचा साखरपुडा झाला होता. वाराणसी शहरातील प्रतिमा राष्ट्रीय बास्केटबॉल संघातील सदस्य असून तिच्या मॅचेसला इशांत आवर्जुन हजेरी लावतो.

                                  

                                 

                                  

                                  

                                  

तिच्या घरातील अनेक जण बास्केटबॉलशी निगडित आहेत. तिच्या चार बहीणीही बास्केटबॉल खेळाडू आहेत. त्यांना बास्केटबॉल खेळाडू ‘सिंग सिस्टर्स’ म्हणून ओळखले जाते.

त्यांच्या लग्नाचे सेलिब्रेशन आणि विधी ४ डिसेंबर रोजी वाराणसी येथे पूजा करून सुरू झाले. भारतीय क्रिकेट बोर्डाने लग्नासाठी इशांतला कसोटी संघातून सुटी दिली होती. टीम सहकारी युवराज सिंगचेदेखील काही दिवसांपूर्वी लग्न झाले. चंदीगढ येथील फतेगड साहिब गुरूद्वारा येथे युवी आणि हेजलच्या लग्नाचा हा नयनरम्य सोहळा पार पडला.

चंदीगड येथे शीख धार्मिकविधींनुसार विवाह झाल्यानंतर त्यांनी गोव्याच्या समुद्रकिनारी हिंदू धर्मानुसारही लग्नविधी केले. त्यानंतर दिल्लीत आलिशान रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे एम. एस. धोनी युवराजच्या लग्नापासून दूरच राहिला होता. लव्हबर्डस् विराट आणि अनुष्का शर्मा मात्र एकत्र एकत्र लग्नाला आले होते.

Web Title: Ishant Sharma too Shubhamangal! Look who's at his wedding ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.