ईशा गुप्ताने टरबूज खातानाचा फोटो केला शेअर, पण कॅप्शनमध्ये लिहिले डाळिंब!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2018 21:43 IST2018-04-11T16:02:55+5:302018-04-11T21:43:20+5:30

‘जन्नत-२, रूस्तम, कमांडो आणि बादशाहों’ यांसारख्या चित्रपटांत झळकलेली अभिनेत्री ईशा गुप्ता नेहमीच तिचे बोल्ड फोटो शेअर करून सोशल मीडियावर ...

Isha secretly shared photos of watermelon, but wrote captions pomegranate! | ईशा गुप्ताने टरबूज खातानाचा फोटो केला शेअर, पण कॅप्शनमध्ये लिहिले डाळिंब!

ईशा गुप्ताने टरबूज खातानाचा फोटो केला शेअर, पण कॅप्शनमध्ये लिहिले डाळिंब!

न्नत-२, रूस्तम, कमांडो आणि बादशाहों’ यांसारख्या चित्रपटांत झळकलेली अभिनेत्री ईशा गुप्ता नेहमीच तिचे बोल्ड फोटो शेअर करून सोशल मीडियावर खळबळ उडवून देत असते. बºयाचदा ती तिच्या फोटोंवरून ट्रोलही होत असते. मात्र आता तिने शेअर केलेल्या एका फोटोमुळे स्वत:च स्वत:चे हसू केले आहे. होय, ईशा गुप्ताने इन्स्टाग्रामवर टरबूज खातानाचा एक फोटो शेअर केला. ज्याच्या कॅप्शनमध्ये तिने पोमेग्रेनेट म्हणजेच डाळिंब असे लिहिले. अशात चाहत्यांनी ईशाला टार्गेट करताना तिची खिल्ली उडविण्यास सुरुवात केली आहे. टरबूज खातानाच्या फोटोला डाळिंब म्हणून ईशाने स्वत:च स्वत:ची फसगत केली आहे.

एका युजरने ईशाला टॅग करताना लिहिले की, ‘तू प्रीक्लास नक्कीच बंक करून पळून जात असशील.’ ईशाचे चाहते तिला सांगत आहेत की तर डाळिंब नसून टरबूूज आहे. आणखी एका युजरने ईशाच्या फोटोला Watermelon became hotmelon..।अशी कॉमेण्ट दिली. खरं तर पहिल्यांदाच ईशाला अशा पद्धतीने ट्रोल केले जात आहे असे नाही. कारण यापूर्वीही तिला बºयाचदा ट्रोलर्सचा सामना करावा लागला आहे. ईशा नेहमीच तिच्या बोल्ड फोटोंमुळे ट्रोलर्सच्या निशाण्यावर असते. काही दिवसांपूर्वीच ईशा अजय देवगणसोबत ‘बादशाहों’मध्ये बघावयास मिळाली होती. आता ती ‘पलटन’ या चित्रपटामध्ये व्यस्त असून, तिचा हा चित्रपट ७ सप्टेंबर २०१८ रोजी प्रदर्शित होणार आहे. 



दरम्यान, काही दिवसांपूर्वीच ईशाने उत्तर प्रदेशातील दोन गावे दत्तक घेतली. त्याठिकाणी ती मुलांच्या शिक्षणासाठी व्यवस्था करून देणार आहे. तसेच काही दिवसांपूर्वीच ईशाचे इन्स्टाग्राम अकाउंट हॅक झाले होते. बॉम्बे टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वीच ईशा गुप्ताच्या एका मित्राने तिला मॅसेज पाठविला होता. त्याने मॅसेजमध्ये लिहिले होते की, ‘हे बेबी, तुझा फोन हरवला हे ऐकून मला दु:ख वाटले. हा माझा नंबर आहे.’ ईशाने जेव्हा हा मॅसेज बघितला तेव्हा ती दंग झाली. कारण तिने तिच्या मित्राला कुठलाही मॅसेज पाठविला नव्हता. त्यानंतर ईशाला संशय आला की, तिचे इन्स्टाग्राम अकाउंट हॅक करण्यात आले. 

Web Title: Isha secretly shared photos of watermelon, but wrote captions pomegranate!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.