दीपिका पादुकोणाच्या आगामी चित्रपटात इरफान खान साकारणार दाऊदची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2017 09:36 IST2017-10-28T04:06:39+5:302017-10-28T09:36:39+5:30

इरफान खानचे फार चाहते आहेत त्याच्या हिंदी मीडियम चितपटातील अभिनयमुळे  तर त्याच्या चाहत्यांच्या संख्येत आणखीन वाढ झाली आहे. आता ...

Irrfan Khan plays Dawood's role in the forthcoming film of Deepika Padukone | दीपिका पादुकोणाच्या आगामी चित्रपटात इरफान खान साकारणार दाऊदची भूमिका

दीपिका पादुकोणाच्या आगामी चित्रपटात इरफान खान साकारणार दाऊदची भूमिका

फान खानचे फार चाहते आहेत त्याच्या हिंदी मीडियम चितपटातील अभिनयमुळे  तर त्याच्या चाहत्यांच्या संख्येत आणखीन वाढ झाली आहे. आता सगळ्यांना त्याच्या आगामी चित्रपटाची उत्सुकता लागलेली आहे. इरफान आता अजून एक झटका देण्यासाठी सज्ज होतो आहे. मिळालेल्या माहितीनुसार इरफान त्याच्या आगामी चित्रपटात डॉनची भूमिका साकारणार आहे. दीपिका पादुकोणचा आगामी चित्रपट 'सपना दीदी'मध्ये अभिनेता इरफान खान कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमच्या भूमिकेत दिसणार आहे. इरफानने याआधी अनेकवेळा डॉनच्या भूमिका केल्या आहेत पण पहिल्यांदाच तो मोठ्या पडद्यानर दाऊदची भूमिका करतो आहे. 

आपल्याला मिळालेल्या भूमिकेपेक्षा इरफान यागोष्टीसाठी जास्त खुष आहे कि त्याला पुन्हा एकदा दीपिका पादुकोणसोबत काम करायला मिळणार आहे.  इरफानने म्हटले 'दीपिका सारख्या कमालीच्या अभिनेत्री बरोबर काम करणे म्हणजे स्वप्न पूर्ण होण्यासारखे आहे'.  आता तुम्हाला आम्ही काहि गोष्टी चित्रपटाविषयी सांगतो. चित्रपट 'सपना दीदी' सांगायचे झाल्यास, हा चित्रपट सत्यघटनेवर आधारित आहे. रहिमा खान नावाची लेडी डॉन सपना दीदीच्या नावाने प्रसिद्ध होती. रहिमाने आपल्या नवऱ्याच्या मृत्यूचा सूड उगवण्यासाठी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला जीवे मारण्याचा प्लॅन आखला होता पण त्यात तिचा स्वत:चाच मृत्यू झाला. 

हनी त्रेहान दिग्दर्शित या चित्रपटात सपना दीदीच्या भूमिकेत दीपिका पादुकोण झळकणार आहे. तर ह्या चित्रपटाची निर्मिती विशाल भारद्वाज करत आहे. या चित्रपटाचे शूटिंग कधी सुरू होणार त्याबद्दल अजून काही ठरलेले नाही. दीपिका सध्या पद्मावतीच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. दीपिकाचा पद्मावती 1 डिसेंबला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातील नुकतेच रिलीज झालेले पहिले गाणं घूमर तुफान हिट ठरते आहे. या गाण्यात दीपिकाने तब्बल १४ किलोंचा घागरा आणि २० किलोंचे दागिने घातले आहेत. यात राणी पद्मावतीच्या भूमिकेत दीपिका पादुकोण, शाहिद कपूर  महारावल रतन सिंह अर्थात पद्मावतीच्या पतीच्या भूमिकेत तर रणवीर सिंग दिल्लीचा सुल्तान अलाऊद्दीन खिल्जीच्या भूमिकेत दिसणार आहे. 

ALSO READ : #MeToo: महिलाच नाही तर पुरूषांनीही दिली होती ‘सेक्स’ची आॅफर ; इरफान खानचा धक्कादायक खुलासा!!
 

Web Title: Irrfan Khan plays Dawood's role in the forthcoming film of Deepika Padukone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.