इरफानला मराठी चित्रपट करायचाय
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2016 17:11 IST2016-05-30T11:41:50+5:302016-05-30T17:11:50+5:30
इरफान खान आज केवळ बॉलिवुडमध्येच नव्हे तर हॉलिवुडमध्येही अनेक चांगल्याचित्रपटांमध्ये काम क...

इरफानला मराठी चित्रपट करायचाय
इ फान खान आज केवळ बॉलिवुडमध्येच नव्हे तर हॉलिवुडमध्येही अनेक चांगल्याचित्रपटांमध्ये काम करत आहे. इरफानने आपल्या अभिनयातून आपला एक वेगळा ठसानिर्माण केला आहे. बॉलिवुड आणि हॉलिवुडमध्ये काम केल्यानंतर इरफानला आतामराठीत काम करण्याची इच्छा आहे. सैराट या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. हाचित्रपट बॉक्स ऑफिसवरही खूप चांगली कमाई करत आहे. काही दिवसांपूर्वी इरफाननेआपल्या काही जवळच्या मित्रमैत्रिणींसाठी आणि कुटुंबियांसाठी सैराटच्या खास स्क्रिनिंगचेआयोजन केले होते. हा चित्रपट त्याला प्रचंड आवडला असल्याचे तो सांगतो. इरफाननेयाआधीही अनेक मराठी चित्रपट पाहिले आहेत. फँड्री, किल्ला, विहीर, कोर्ट हे मराठीचित्रपट त्याला खूप आवडतात. नागराज मंजुळेचा तर मी फॅन आहे असे तो सांगतो. तसेचअभिनेता नाना पाटेकर यांना नटसम्राट या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळायला पाहिजेहोता असे त्याला वाटते. मी परीक्षक मंडळात असतो तर मी नक्कीच त्यांना राष्ट्रीयपुरस्कार दिला असता असे तो सांगतो.
मराठीत अनेक वेगवेगळे विषय हाताळले जात आहेत. मराठी प्रेक्षक हा अतिशय सजगआहे. त्यामुळे मराठीतील निर्मात्यांनी चांगल्या विषयांवरचे चित्रपट बनवले पाहिजे असेत्याचे म्हणणे आहे. मराठी सिनेमांची दिवसेंदिवस होत असलेली प्रगती पाहाता इरफानलामराठी सिनेमा करण्याची इच्छा आहे. एखादी चांगली संकल्पना असल्यास मराठीचित्रपटात नक्कीच काम करेन. तसेच चित्रपटासाठी मराठीही शिकेन असे त्याचे म्हणणेआहे. इरफानला सध्या मराठी हा भाषा कळत नाही, तसेच त्याला मराठीत बोलायलाहीयेत नाही. पण चित्रपटासाठी मराठी भाषेवर मेहनत घ्यायलाही तो तयार आहे. मराठीतयेत असलेल्या नवीन दिग्दर्शकांमुळे खूप चांगले विषय मराठीत हाताळले जात आहेतयाचा त्याला आनंद होत असल्याचे तो सांगतो.
इरफानचे मराठी चित्रपटांविषयी प्रेम पाहाता पुढील काही काळात इरफान नक्कीच एखाद्यामराठी चित्रपटात झळकेल यात काही शंका नाही.