इरफान खान, लॉर्ड्सवर मॅच पाहायला पोहोचलेला तूच का? पाकी पत्रकाराने केला फोटो व्हायरल!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2018 10:00 IST2018-05-30T04:30:50+5:302018-05-30T10:00:50+5:30

तुमचा आमचा आवडता अभिनेता इरफान खान सध्या एका गंभीर आजाराचा सामना करतोय. खुद्द इरफाननेच दोन महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर याची ...

Irfan Khan, did you reach the match at Lords? Paki journalist photo taken viral !! | इरफान खान, लॉर्ड्सवर मॅच पाहायला पोहोचलेला तूच का? पाकी पत्रकाराने केला फोटो व्हायरल!!

इरफान खान, लॉर्ड्सवर मॅच पाहायला पोहोचलेला तूच का? पाकी पत्रकाराने केला फोटो व्हायरल!!

मचा आमचा आवडता अभिनेता इरफान खान सध्या एका गंभीर आजाराचा सामना करतोय. खुद्द इरफाननेच दोन महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर याची माहिती दिली होती. सध्या इरफानवर लंडनमध्ये उपचार सुरू आहेत. याचदरम्यान इरफानचा एक फोटो वेगाने व्हायरल होतो आहे. हा फोटो लंडनच्या लॉर्ड्स मैदानावरचा आहे. याठिकाणी इरफान इंग्लंड व पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना पाहायला पोहोचला. फोटोत इरफान क्रिकेट सामन्याचा आनंद घेताना दिसतोय. एका पाकिस्तानी फोटोग्राफरने हा फोटो क्लिक केला आहे.



इरफानला कॅमेºयात कैद केल्याचा दावा या फोटोग्राफरने केला आहे. फोटोतील व्यक्ति हुबेहुब इरफानसारखी आहे. पण ती खरंच इरफान आहे की त्याच्यासारखाच दिसणारा अन्य कुणी आहे, याबाबत संशय आहे. फोटोतील व्यक्तिचा उंची, चेहरा, शरीरयष्ठी सगळेकाही इरफानशी मिळतेजुळते आहे. तिच्या डोक्यावर स्कार्फ आहे. पाकिस्तानी क्रीडा पत्रकार जैनब अब्बास यांनी हा फोटो शेअर केला आहे. अद्याप या फोटोवर इरफानच्या कुटुंबाकडून कुठलाही खुलासा आलेला नाही. अली नौमी नामक एका व्यक्तिनेही टिष्ट्वट केले आहे. इरफान खान आत्ता माझ्या डोळ्यांसमोर आहे. काही लोकांनी त्याच्यासोबत फोटो घेण्याची विनंती केली. पण त्याने नम्र नकार दिला. तो बराच अशक्त दिसतोय, असे त्याने म्हटले आहे.

ALSO READ : दोन महिन्यानंतर इरफान खानने केले 'हे' ट्वीट

काही महिन्यांपूर्वी इरफानने एक सावलीचा फोटो शेअर केला होता त्यासोबत एक इमोशनल पोस्ट लिहिली होती. ‘परमेश्वर आपल्यासोबत गुपचूप चालतो आणि तितक्याच हळूवार आपल्यासोबत बोलतो.  तो एका जळत्या वातीसारखा आहे. ज्याच्या सावलीखाली आपण चालत असतो. आयुष्यात जे काही होतंय, ते होऊ द्या. मग ते चांगले असो वा वाईट. फक्त चालत राहा. कारण कुठलीही भावना अखेरची नाही. यालाच आयुष्य म्हणतात... ’ अशा आशयाची ही कविता इरफानने शेअर केली होती. त्याआधी इऱफानने आपल्या आजाराबाबतचा खुलासा सोशल मीडियावरुन केला होता.''मला न्यूरो इंडोक्राईन ट्युमर नामक आजार झाल्याचे निदान झाले आहे. हा आजार स्वीकारणे सोपे नाही. पण माझ्या आजुबाजुला असलेल्या लोकांचे प्रेम आणि प्रार्थना यामुळे माझी आशा कायम आहे. उपचारासाठी मी विदेशात जातो आहे.'' 

Web Title: Irfan Khan, did you reach the match at Lords? Paki journalist photo taken viral !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.