"सर्कसचे कपडे का घातलेस", आयराचा लग्नातील लूक पाहून आमिरच्या लेकीला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2024 05:47 PM2024-01-04T17:47:40+5:302024-01-04T17:48:20+5:30

Ira Khan Wedding : लग्नातील हटके लूकमुळे नुपूरनंतर आता आयरा खानला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...

ira khan nupur shikhare wedding netizens troll aamir khan daughter for bad dressing sense | "सर्कसचे कपडे का घातलेस", आयराचा लग्नातील लूक पाहून आमिरच्या लेकीला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

"सर्कसचे कपडे का घातलेस", आयराचा लग्नातील लूक पाहून आमिरच्या लेकीला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

सध्या जिकडेतिकडे आयरा खानच्या लेकीच्या लग्नाची चर्चा आहे. आयराने बुधवारी(३ जानेवारी) बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत कोर्ट मॅरेज पद्धतीने विवाह करत नव्या आयुष्याला सुरुवात केली. त्यांच्या लग्नातील अनेक फोटो आणि  व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आयरा आणि नुपूरच्या लग्नाबरोबरच त्यांच्या वेडिंग लूकचीही चर्चा रंगली आहे. 

फिटनेस फ्रिक असलेल्या नुपूरने मित्रांबरोबर मॅराथॉन करत लग्नात वरात आणली. स्वत:च्याच लग्नात बनियनवर आल्याने नुपूरला नेटकऱ्यांनी चांगलंच ट्रोल केलं. आता नेटकऱ्यांनी त्यांचा मोर्चा आयराकडे वळवला आहे. वेडिंग लूकवरुन आयरालाही ट्रोल करण्यात आलं आहे. आयराने तिच्या लग्नाच्या रिसेप्शनसाठी डिझायनर ड्रेस परिधान केला होता. पण, तिचा हा लूक नेटकऱ्यांच्या फारसा पसंतीस न उतरल्यामुळे तिला ट्रोल केलं आहे. विरल भय्यानी या इन्स्टाग्राम पेजवरुन आयरा आणि नुपूरचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. 

या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. "नवरी वाटतच नाहीये", असं एकाने म्हटलं आहे. तर दुसऱ्याने "एवढ्या मोठ्या सुपरस्टार मुलगी असूनही स्वत:च्या लग्नात कसे कपडे घातले आहेत," अशी कमेंट केली आहे. "नवरीला पाहून मला चाची ४२० मधील कमल हसन आठवला", असंही एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. तर दुसऱ्याने "सर्कसचे कपडे का घातले आहेस?" असं म्हटलं आहे. 

गेल्या अनेक वर्षांपासून आयरा-नुपूर एकमेकांना डेट करत होते. मे महिन्यात त्यांचा साखरपुडा उरकला होता. आता लग्नबंधनात अडकून त्यांनी आयुष्यभर एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आहे. लग्नानंतर त्यांचं जंगी रिसेप्शनही असणार आहे. 

Web Title: ira khan nupur shikhare wedding netizens troll aamir khan daughter for bad dressing sense

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.