IPL ची कॉमेंट्री करताना दिसला ऑरी! भडकले नेटकरी, म्हणाले, "वर्ल्डकप हिरोंबरोबर..."

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2024 08:55 AM2024-03-23T08:55:35+5:302024-03-23T08:55:57+5:30

IPL च्या कॉमेंट्री बॉक्समध्ये ऑरीला पाहून नेटकऱ्यांचा संताप, म्हणाले...

ipl 2024 orry joins commentry panel with virendra sehwag and suresh raina netizens angry reaction | IPL ची कॉमेंट्री करताना दिसला ऑरी! भडकले नेटकरी, म्हणाले, "वर्ल्डकप हिरोंबरोबर..."

IPL ची कॉमेंट्री करताना दिसला ऑरी! भडकले नेटकरी, म्हणाले, "वर्ल्डकप हिरोंबरोबर..."

IPL च्या नव्या हंगामाला जोरदार सुरुवात झाली आहे. शुक्रवारी(२२ मार्च) आयपीएलच्या १७व्या हंगामाचा उद्घाटन सोहळा पार पडला. अक्षय कुमार, ए.आर.रहमान, सोनू निगम, टायगर श्रॉफ या बॉलिवूड कलाकारांनी आयपीएलच्या ओपनिंग सेरेमनीमध्ये परफॉर्म करत चार चांद लावले. यावेळी आयपीएलच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये ऑरीदेखील दिसला. पण, हे पाहून नेटकऱ्यांचा पारा चढला.

सेलिब्रिटींच्या पार्टी आणि लग्नसमारंभात दिसणारा ऑरी यंदा मात्र आयपीएलच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये दिसून आला. जिओ सिनेमावर सुरू असलेल्या आयपीएलमधील कमेंटेटर्स पॅनेलमध्ये ऑरीही दिसला. सचिन तेंडुलकर आणि विरेंद्र सहवागबरोबर त्याने कॉमेंट्री करत त्याचा हेलिकॉप्टर शॉट दाखवला. पण, कॉमेंट्री बॉक्समध्ये क्रिकेटमधील दिग्गजांबरोबर ऑरीला पाहून मात्र नेटकरी संतापले आहेत. आयपीएलमधील ऑरीचे फोटो शेअर करत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

"ऑरी क्रिकेट एक्सपर्ट आहे का? वर्ल्ड कपच्या हिरोंबरोबर हा स्टेज शेअर करत आहे', असं एकाने म्हटलं आहे.  "याने फक्त सेलिब्रिटींबरोबरच सेल्फी घ्याव्यात", अशी कमेंटही केली आहे. 

"भारताच्या क्रिकेट इतिहासातील काळा दिवस", असं म्हणत नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. 

"यांच्याकडे काही टॅलेंट नसल्यामुळे ते बिग बॉसमध्ये होते. आयपीएल खराब करू नका"

दरम्यान, आयपीएल २०२४ मधील पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू आणि चेन्नई सुपर किंग्ज दोन टीममध्ये खेळवला गेला. यामध्ये चेन्नई सुपर किंग्जने बाजी मारत पहिला विजय मिळवला. बंगळुरूने दिलेल्या १७४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईच्या संघाने १८.४ षटकांत ४ बाद १७६ धावा करून विजय साकारला.

Web Title: ipl 2024 orry joins commentry panel with virendra sehwag and suresh raina netizens angry reaction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.