प्रेक्षकांना घाबरविण्याचे सोडून रिअल लाइमध्ये ‘हे’ काम करीत आहे ‘पुराना मंदिर’चे भूत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2017 19:58 IST2017-12-20T14:28:19+5:302017-12-20T19:58:19+5:30
८० च्या दशकातील ‘पुराना मंदिर’ आणि ‘बंद दरवाजा’ या चित्रपटातून प्रेक्षकांना घाबरविणारे भूत सध्या रिअल लाइफमध्ये हे काम करताना दिसत आहे.

प्रेक्षकांना घाबरविण्याचे सोडून रिअल लाइमध्ये ‘हे’ काम करीत आहे ‘पुराना मंदिर’चे भूत!
८ च्या दशकात रिलीज झालेल्या हॉरर चित्रपटांची गणती आजही सर्वोत्कृष्ट चित्रपटांमध्ये केली जाते. ‘पुराना मंदिर’ आणि ‘बंद दरवाजा’ हे चित्रपट तर आजही प्रेक्षक आवडीने बघतात. बलदंड शरीर असलेले कलाकारच मेकअपद्वारे भूत बनून प्रेक्षकांना घाबरवित असल्याचे या चित्रपटांमध्ये बघावयास मिळते. असाच बलदंड शरीर असलेला कलाकार त्याकाळी प्रेक्षकांना घाबरविण्याचे काम करीत होता. खरं तर भूत आणि खूंखार व्हिलनसाठी हा कलाकार दिग्दर्शकांची पहिली पसंत होता. होय, आम्ही अनिरुद्ध अग्रवाल याच्याविषयी सांगत आहोत. त्याकाळी हॉरर चित्रपटांमध्ये अनिरुद्ध अग्रवाल खालनायक आणि भूताच्या भूमिकेसाठी एकदम फिट होता. परंतु आता या कलाकाराने लोकांना घाबरविण्याचे काम सोडून दिले आहे.
ंैवास्तविक अनिरुद्ध अग्रवाल याने हीरो बनण्याची इच्छा ठेवून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले होते. मात्र त्याला हीरो न बनता व्हिलन म्हणूनच चित्रपटांमध्ये काम मिळत गेले. स्क्रीनवर दरोडा, हत्या तसेच बलात्काराचे सीन करण्यासाठी अनिरुद्ध निर्मात्यांची फर्स्ट चॉइस बनत गेला. पुढे तो एक भयानक खलनायक म्हणून समोर आला. अनिरुद्ध अग्रवाल याने त्याच्या करिअरमध्ये ‘बंद दरवाजा, पुरानी हवेली आणि पुराना मंदिर’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. त्याचबरोबर ‘बॅँडिट क्विन’मध्ये त्याने बाबू गुज्जरची भूमिका साकारली.
खरं तर अनिरुद्ध याची खरी ओळख त्याचे बलदंड शरीर हेच आहे. त्यामुळेच हॉरर चित्रपटांची क्रेझ कमी झाल्यानंतर अनिरुद्ध अग्रवाल याच्या अडचणी सुरू होत गेल्या. त्यामुळे त्याने छोट्या पडद्यावर आपला मोर्चा वळविला. परंतु याठिकाणी देखील फारसे काही करता आले नाही. काही मालिकांमध्ये निगेटिव्ह भूमिका साकारल्यानंतर त्याला काम मिळणे बंद झाले. त्यामुळेच गेल्या सात वर्षांपासून अनिरुद्ध पडद्यावरून गायब आहे. अनिरुद्ध अखेरीस विल्सन लुइसच्या ‘मल्लिका’ (२०१०) मालिकेत बघावयास मिळाला होता. त्यानंतर या महाकाय खलनायकाने फिल्मी दुनियेला बाय-बाय केले. सध्या अनिरुद्ध बिझनेसमॅनची भूमिका पार पाडत आहे. कारण तो अधिकाधिक आपल्या कुटुंबीयांना वेळ देत आहे.