एमी जॅक्सनचे बेबी शॉवरचे फोटो आले समोर, लवकरच देणार बाळाला जन्म

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2019 11:50 AM2019-08-31T11:50:57+5:302019-08-31T11:53:43+5:30

एमीसह तिच्या कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. त्यामुळे आता सर्वच तिच्या बाळाच्या येण्याची आतुरतेन वाट पाहातायेत. लवकरच एमी बाळाला जन्म देणार आहे.

Inside Amy Jackson's Dreamy Baby Shower. See Pics | एमी जॅक्सनचे बेबी शॉवरचे फोटो आले समोर, लवकरच देणार बाळाला जन्म

एमी जॅक्सनचे बेबी शॉवरचे फोटो आले समोर, लवकरच देणार बाळाला जन्म

googlenewsNext

अभिनेत्री एमी जॅक्सनने काही दिवसांपुर्वी सोशल मिडियावर ती प्रेग्नेंट असल्याची माहिती दिली होती . त्यानंतर काही दिवसातच तिने बेबी बंपचा फोटो शेअर केला होता. ती सतत तिच्या प्रेग्नंसीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.  एमीने सोशल मीडियावर बिनधास्त फोटो आणि व्हिडीओ शेअर करण्याचा सपाटा तिने लावला आहे.  आता तिचे तिच्या घरी एका पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तिचा बेबी शॉवर म्हणजेच डोहाळे जेवणाचा  कार्यक्रम पार पडला. त्याचे फोटो तिने सोशल मीडियावरही शेअर केले आहेत.


 फोटोला समर्पक अशी कॅप्शनही तिने दिली आहे. आपण आपल्या जीवनात खूश असल्याचेही तिने म्हटलं आहे. यावेळी तिचे कुटुंबियासह तिचे मित्र मंडळींही सहभागी झाले होते. यावेळी खास पार्टीत ब्लू थीम ठेण्यात आली होती. एमी यावेळी एका परीप्रमाणेच दिसत होती.  एमी खूप खुश दिसते. तिच्या आनंदाला पारावर उरला नाही. अॅमीसह तिच्या कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.  त्यामुळे आता सर्वच तिच्या बाळाच्या येण्याची आतुरतेन वाट पाहातायेत. लवकरच एमी बाळाला जन्म देणार आहे.  

काही दिवसांपूर्वीच एमीने हॉस्पीटलमधला अल्ट्रा साऊंड व्हिडीओ शेअर केला आहे.  सध्या एमीचा हा अल्ट्रा साऊंड व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता. या व्हिडीओत एमीच्या पोटातील बाळाची हालचाल स्पष्टपणे दिसत आहे.   साहजिकच या व्हिडीओवर  प्रतिक्रियाही आल्या. केवळ इतकेच नाही तर एमीला मुलगा होईल की मुलगी, यावरूनही चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्यात.  


एमीचा बॉयफ्रेंड  जॉर्ज हा ब्रिटीश प्रॉपर्टी डेव्हलपर अँड्स पानायिटूचा मुलगा आहे. त्याचा ‘क्वीन सिटी’ नावाचा एक अलिशान नाईटक्लब आहे. एमीला डेट करण्यापूर्वी जॉर्ज पॉप गायिका शेरिल कोलला डेट करत होता. पण कालांतराने दोघांचेही ब्रेकअप झाले आणि जॉर्जला एमी मिळाली.

Web Title: Inside Amy Jackson's Dreamy Baby Shower. See Pics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.