भारतीय नौदलाने विनोद खन्ना यांना निवासस्थानी दिला ‘गार्ड आॅफ आॅनर’

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2017 16:54 IST2017-04-28T11:24:33+5:302017-04-28T16:54:33+5:30

अभिनेता तथा दिवंगत खासदार विनोद खन्ना यांना भारतीय नौदलाने ‘गार्ड आॅफ आॅनर’ देऊन सन्मानित केले. वृत्तानुसार विनोद खन्ना यांची ...

Indian guard: Vinod Khanna gets 'guard of honor' | भारतीय नौदलाने विनोद खन्ना यांना निवासस्थानी दिला ‘गार्ड आॅफ आॅनर’

भारतीय नौदलाने विनोद खन्ना यांना निवासस्थानी दिला ‘गार्ड आॅफ आॅनर’

िनेता तथा दिवंगत खासदार विनोद खन्ना यांना भारतीय नौदलाने ‘गार्ड आॅफ आॅनर’ देऊन सन्मानित केले. वृत्तानुसार विनोद खन्ना यांची फॅमिली हा सन्मान कुठल्याही चर्चेविना स्वीकारण्यास इच्छुक होती. त्यामुळेच नौदलाच्या अधिकाºयांनी त्यांच्या निवासस्थानी त्यांना हा सन्मान दिला. 

विनोद खन्ना यांची फॅमिली सुरुवातीपासूनच विनोद खन्ना यांचा अंत्यविधी सामान्य पद्धतीने करू इच्छित होती. त्या पद्धतीने अंत्यविधी पारही पडला. जेव्हा श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले, त्याचदरम्यान त्यांना नौदलाने ‘गार्ड आॅफ आॅनर’ देऊन सन्मानित केले. 

विनोद खन्ना यांचे वयाच्या ७०व्या वर्षी कर्करोगाने निधन झाले. गुरुवारी सायंकाळी त्यांच्यावर वरळी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा लहान मुलगा साक्षी खन्ना याने त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिली. यावेळी बॉलिवूड जगतातील अनेक दिग्गज सेलिब्रिटी उपस्थित होते. 

विनोद खन्ना यांची पहिली पत्नी गीतांजली, दुसरी पत्नी कविता, महानायक अमिताभ बच्चन, गुलजार, रणधीर कपूर, ऋषी कपूर, अभिषेक बच्चन, कबीर बेदी, रंजित, सुभाष घई, दिया मिर्झा, डॅनी यांच्यासह राजकीय क्षेत्रातील अनेक मंडळी उपस्थित होती. सोशल मीडियावरदेखील त्यांना मोठ्या प्रमाणात श्रद्धांजली वाहण्यात आली. 

Web Title: Indian guard: Vinod Khanna gets 'guard of honor'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.