सलमान खानचा सल्ला मानून ‘या’ अभिनेत्याने केली होती मोठी चूक!!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2018 10:44 AM2018-08-26T10:44:02+5:302018-08-26T10:46:58+5:30

बॉलिवूड अभिनेता इंदर कुमार याचा आज (२६ आॅगस्ट) वाढदिवस.२६ आॅगस्ट १९७३ रोजी राजस्थानच्या जयपूर येथे इंदरचा जन्म झाला. 

inder kumar birthday special how his career destroy | सलमान खानचा सल्ला मानून ‘या’ अभिनेत्याने केली होती मोठी चूक!!

सलमान खानचा सल्ला मानून ‘या’ अभिनेत्याने केली होती मोठी चूक!!

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेता इंदर कुमार याचा आज (२६ आॅगस्ट) वाढदिवस. आज इंदर कुमार आपल्यात नाही. २६ आॅगस्ट १९७३ रोजी राजस्थानच्या जयपूर येथे इंदरचा जन्म झाला. ‘मासूम’ या चित्रपटातून इंदरने आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीची सुरुवात केली. यानंतर सलमान खानसोबत ‘वॉन्टेड’ आणि ‘तुमको ना भूल पाएंगे’ या चित्रपटातही तो दिसला.
सुरूवातीच्या काळात इंटर लीड रोलमध्ये दिसला. अर्थात त्याचे चित्रपट बॉक्सआॅफिसवर फार कमाल दाखवू शकले नाहीत. सतत फ्लॉप चित्रपट दिल्यानंतर इंदरला सपोर्टिंग रोल करणे भाग पडले.
खरे तर स्टार बनण्यासाठी इंदरने जीवतोड मेहनत घेतली. पण त्याच्या करिअरचा ग्राफ वर-वर चढण्याऐवजी खालीच घसरला. याचदरम्यान इंदरला एका दुर्घटनेने गाठले. होय, ‘मसीहा’च्या एका सीनवेळी इंदरला जीवघेणा अपघात झाला. एक स्टंट सीन करताना तो हेलिकॉप्टरमधून खाली पडला. या अपघातानंतर इंदर तीन वर्षे पलंगावर होता. याकाळात फिल्म इंडस्ट्रीसोबतचा त्याचा संबंध तुटला.
एका मुलाखतीत इंदरने  सांगितले होते की, शूटींगदरम्यान मी हेलिकॉप्टरमधून पडलो. तीन वर्षे मला बेड रेस्ट सांगितला गेला. मी माझ्या पायावर उभा होऊ शकेल की नाही, याचीही शाश्वती नव्हती.
तीन वर्षानंतरच्या घडामोडीदरम्यान इंदरला बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. मिडे डेला दिलेल्या मुलाखतीत याबद्दल इंदरने सांगितले होते की, माझ्या अटकेनंतर माझी मुलगी आजारी पडली. माझ्या पत्नीने माझ्या जामीनासाठी अनेकांकडे मदत मागितली. पण त्यावेळी कुणीच मदतीला आले नाही. घर भाड्याने घ्यायला माझ्याकडे पैसे नव्हते. एका मित्राने मला त्याच्या घरात आश्रय दिला. त्याकाळात डॉली बिंद्राने माझी मदत केली. तिच्याशिवाय फिल्म इंडस्ट्रीतल्या कुण्याही व्यक्तिने मला एक साधा फोनही केला नाही.
चर्चा खरी मानाल तर, या काळात इंदरला ‘बिग बॉस’ची आॅफरही आली होती. पण सलमानने त्याला ही आॅफर न स्वीकारण्याचा सल्ला दिला होता. कारण सलमान इंदरच्या प्रकृतीबद्दल माहित होते. सलमानवर विश्वास ठेवून इंदरने ही आॅफर नाकारली.


गतवर्षी २८ जुलैला इंदरकुमारचे निधन झाले. हृदयविकाराच्या धक्क्याने त्याचे निधन झाले. अर्थात त्याने आत्महत्या केली, अशीही चर्चा त्यावेळी होती. मृत्यूपूर्वीच्या त्याच्या एका व्हिडिओमुळे या चर्चेला बळ मिळाले होते. मी आत्महत्या करू इच्छितो, मी खूप दूर जातोय.असे तो या व्हिडिओ म्हणतांना दिसला होता. पण नंतर हा व्हिडिओ त्याच्या आगामी चित्रपटाच्या तयारीचा होता, असे सांगितले गेले.

 

Web Title: inder kumar birthday special how his career destroy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.