'थलायवा' रजनीकांत ते रणबीर कपूर, टीम इंडियाला चिअर करण्यासाठी 'वानखेडे'वर अवतरलं बॉलिवूड

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2023 03:59 PM2023-11-15T15:59:24+5:302023-11-15T16:17:33+5:30

वर्ल्डकप सेमीफायनलचा भारत-न्यूझीलंड सामना पाहण्यासाठी बॉलिवूड वानखेडेवर उतरल्याचं पाहायला मिळालं. 

ind vs nz world cup 2023 ranbir kapoor rajinikanth anushka sharma sara tendulkar at wankhede to cheer team india | 'थलायवा' रजनीकांत ते रणबीर कपूर, टीम इंडियाला चिअर करण्यासाठी 'वानखेडे'वर अवतरलं बॉलिवूड

'थलायवा' रजनीकांत ते रणबीर कपूर, टीम इंडियाला चिअर करण्यासाठी 'वानखेडे'वर अवतरलं बॉलिवूड

सध्या सगळीकडे वर्ल्डकपचा फिव्हर आहे. आज मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंडमध्ये वर्ल्डकप सेमी फायनलचा थरार रंगत आहे. हा सामना लाइव्ह पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमींनी वानखेडे स्टेडियममध्ये हजेरी लावली आहे. तर अनेक कलाकारही टीम इंडियासा चिअर करण्यासाठी स्टेडियममध्ये पोहोचले आहेत. वर्ल्डकप सेमीफायनलचा भारत-न्यूझीलंड सामना पाहण्यासाठी बॉलिवूड वानखेडेवर उतरल्याचं पाहायला मिळालं. 

भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीला सपोर्ट करण्यासाठी अभिनेत्री अनुष्का शर्मा वानखेडेमध्ये पोहोचली. रोहितची विकेट पडल्यानंतर विराट मैदानात उतरला. तेव्हा अनुष्का त्याला चिअर करताना दिसली. अनुष्काबरोबरच रणबीर कपूर, जॉन अब्राहमदेखील वानखेडेत मॅच बघण्यासाठी पोहोचले. रणबीरने इंडियाची जर्सी घातलेली पाहायला मिळाली. तर सिद्धार्थ मल्होत्रा पत्नी कियारा अडवाणीसह टीम इंडियाला चिअर करण्यासाठी आला. सुपरस्टार रजनीकांतही या सामन्यासाठी उपस्थित होते.  बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरही भारत-न्यूझीलंड सामना पाहण्यासाठी वानखेडे स्टेडियममध्ये हजर होता. 

बॉलिवूड सेलिब्रिटींबरोबरच प्रसिद्ध व्यावसायिका नीता अंबानीदेखील टीम इंडियाला चिअर करण्यासाठी वानखेडेवर पोहोचल्या. तर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकरही या सामन्यादरम्यान चिअर करताना दिसली. लोकप्रिय फुटबॉलपटू डेव्हिड बॅकहेमदेखील भारत-न्यूझीलंड सामना पाहण्यासाठी वानखेडेवर पोहोचला होता.  

दरम्यान, भारत, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या चार संघांनी उपांत्य फेरीत स्थान मिळवले आहे. आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला उपांत्य सामना होत आहे. तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका भिडणार आहे. भारतीय संघाने सलग नऊ विजय मिळवून उपांत्य फेरी गाठली. त्यामुळे वर्ल्डकपसाठी देशवासियांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. 
 

Web Title: ind vs nz world cup 2023 ranbir kapoor rajinikanth anushka sharma sara tendulkar at wankhede to cheer team india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.