९ वर्षांनंंतर या सिनेमातून इमरान खानला करायचंय बॉलिवूडमध्ये कमबॅक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2024 12:51 PM2024-02-07T12:51:33+5:302024-02-07T12:58:53+5:30

इमरान खानने बॉलिवूड कमबॅकसाठी मोठी इच्छा व्यक्त केलीय

Imran Khan wants to make a comeback in Bollywood with this movie after 9 years jaane tu ya jaane na | ९ वर्षांनंंतर या सिनेमातून इमरान खानला करायचंय बॉलिवूडमध्ये कमबॅक

९ वर्षांनंंतर या सिनेमातून इमरान खानला करायचंय बॉलिवूडमध्ये कमबॅक

आमिर खानचा (Aamir Khan) भाचा इमरान खान हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता. इमरानचं करिअर यशस्वी नसलं तरीही त्याचं फॅन फॉलोईंग चांगलं आहे. एकामागोमाग एक सिनेमे करत असताना इमरान एकाएकी बॉलिवूडमधून गायब झाला. इमरान खानचे (Imran Khan) चाहते त्याला चांगलंच मिस करत आहेत. काही दिवसांपुर्वी आमिर खानची लेक आयराच्या (Ira Khan) लग्नात इमरान स्पॉट झाला. तेव्हापासून इमरानला सिनेमात पाहायला फॅन्स उत्सुक आहेत, अशा प्रतिक्रियांचा पाऊस पडायला सुरुवात झालीय. अखेर इमराननेच त्याच्या कमबॅकविषयी मोठा खुलासा केलाय.

इमरानने एका मुलाखतीत त्याच्या कमबॅकबद्दल सांगितलंय. इमरान म्हणाला, "मला जाने तू या जाने ना सिनेमाच्या सीक्वेल मधून कमबॅक करायला नक्की आवडेल. जाने तू... ही अनेकांच्या आयुष्याची कथा आहे. माझ्यासाठी जयचा हा प्रवास खूप काही शिकवून गेलाय. विचारांनी मोठ्या होणाऱ्या दोन व्यक्तींचा प्रेम शोधण्याचा प्रवास म्हणजे जाने तू या जाने ना. आता या सिनेमातल्या पात्रांचा पुढचा प्रवास कसा असेल, ते पाहायला मी उत्सुक आहे."

'जाने तू या जाने ना' हा २००८ साली आलेला सिनेमा इमरान खानचा पहिला सिनेमा. या सिनेमाच्या माध्यमातून इमरानने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. आमिर खानने या सिनेमाची निर्मिती केली होती. तर या सिनेमात इमरानशिवाय अभिनेत्री जिनिलीया देशमुख, नसीरुद्दीन शाह, रत्ना पाठक शाह या कलाकारांच्या प्रमुख भूमिका होत्या. या सिनेमाला प्रेक्षक-समीक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. ९ वर्षांनंतर इमरानने 'जाने तू या जाने ना' सिनेमाच्या माध्यमातून कमबॅक केलं, तर त्याच्या फॅन्सना नक्कीच आवडेल यात शंका नाही.

Web Title: Imran Khan wants to make a comeback in Bollywood with this movie after 9 years jaane tu ya jaane na

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.