इमरान हाश्मी बॉलिवूडच्या ह्या खानसोबत करणार काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2018 06:00 IST2018-07-29T06:00:00+5:302018-07-29T06:00:00+5:30
'बार्ड ऑफ ब्लड' या वेबसीरिजची कथा भारतातील गुप्तहेर कबीर आनंदवर आधारीत असून मुख्य भूमिकेत इमरान हाश्मी दिसणार आहे.

इमरान हाश्मी बॉलिवूडच्या ह्या खानसोबत करणार काम
नेटफ्लिक्सवर एकापेक्षा एक दमदार वेबसीरिज दाखल होत आहेत.काही दिवसांपूर्वी नेटफ्लिक्सने बॉलिवूडचा किंग खान शाहरूख व त्याचा प्रोडक्शन हाऊस रेड चिलीज एण्टरटेन्मेंटसोबत 'बार्ड ऑफ ब्लड' या वेबसीरिजची घोषणा केली होती. ही सीरिज लेखक बिलाल सिद्दीकी यांच्या पुस्तकावर आधारीत आहे. या पुस्तकात राजकीय गुप्तहेरावराची कथा असून आठ भागात ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
शाहरूख 'बार्ड ऑफ ब्लड' या वेबसीरिजमध्ये अभिनय करणार नाही आहे. मात्र या वेबसीरिजमध्ये मुख्य भूमिकेसाठी बॉलिवूडचा सीरियल किसर म्हणजेच अभिनेता इमरान हाश्मीची निवड करण्यात आली आहे. नेटफ्लिक्स इंडियाने नुकताच या बार्ड ऑफ ब्लडचा पहिला टीझर प्रदर्शित केला आहे. त्यात इमरान कादंबरी वाचत आहे आणि म्हणतो आहे की देवाने तुम्हाला एक चेहरा दिला आहे आणि तुम्ही स्वतःला आणखीन वेगळे बनवता.
तसेच इमरानने याबाबतची माहिती ट्विटरवर दिली आहे. त्याने लिहिले आहे की, 'होणार आहे किंवा नाही होणार...उत्तर असणार आहे...कबीर आनंद बनायला तयार...या थ्रिलिंग प्रवासाचा भाग बनण्यासाठी उत्साहीत आहे.'
‘To be, or not to be’...
— emraan hashmi (@emraanhashmi) July 27, 2018
The answer is to be. Ready 'to be' Kabir Anand. Excited to be a part of this thrilling journey !! 😀@NetflixIndia@RedChilliesEnt@iamsrk@_gauravverma@bilals158#EmraanInBardOfBloodhttps://t.co/d5l1EfeHFr
शाहरूखने या वेबसीरिजची घोषणा २०१७मध्ये केली होती. त्याने सांगितले होते की,'आम्ही नेहमीच भारतात वर्ल्ड क्लास कंटेट बनवण्याचा प्रयत्न केला आहे. नेटफ्लिकवर जगभरातील प्रेक्षक आहेत आणि या माध्यमातून चांगल्या कथा सादर करणार आहोत.'
'बार्ड ऑफ ब्लड' या वेबसीरिजची कथा भारतातील गुप्तहेर कबीर आनंदवर आधारीत असून जो आपला देश व बऱ्याच कालावधीपासून दुरावलेल्या प्रेमाला वाचवण्यासाठी पंचगणीमध्ये त्याला प्रोफेसर बनावे लागते, पुढे काय होते हे पाहण्यासाठी ही सीरिज पाहावी लागेल. या सीरिजचे चित्रीकरण बऱ्याच ठिकाणी करण्यात आले आहे. ही सीरिज हिंदी, उर्दु, इंग्रजी व इतर भाषेत पहायला मिळणार आहे.