IMDbने जाहिर केली प्रसिद्ध वेब सीरिजची यादी, सेक्रेड गेम्सने सगळ्यांना टाकलं मागं

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2023 06:49 PM2023-06-07T18:49:24+5:302023-06-07T18:53:17+5:30

IMDb या चित्रपट, टीव्ही शोज आणि सेलिब्रिटीजच्या सर्वांत प्रसिद्ध सोर्सनं आज भारतातील IMDb युजर्सच्या पेज व्ह्यूजनुसार आजवरच्या टॉप 50 सर्वाधिक प्रसिद्ध वेब सीरिजची यादी प्रसिद्ध केली आहे.

Imdb announces top 50 all time most popular indian web series list sacred games number one | IMDbने जाहिर केली प्रसिद्ध वेब सीरिजची यादी, सेक्रेड गेम्सने सगळ्यांना टाकलं मागं

IMDbने जाहिर केली प्रसिद्ध वेब सीरिजची यादी, सेक्रेड गेम्सने सगळ्यांना टाकलं मागं

googlenewsNext

IMDb या चित्रपट, टीव्ही शोज आणि सेलिब्रिटीजच्या सर्वांत प्रसिद्ध सोर्सनं आज भारतातील IMDb युजर्सच्या पेज व्ह्यूजनुसार आजवरच्या टॉप 50 सर्वाधिक प्रसिद्ध भारतीय वेब सीरिजची यादी प्रसिद्ध  केली आहे.


“आमच्या यादीमधील सर्वोच्च स्थानी असलेल्या दोन मालिका (सेक्रेड गेम्स आणि मिर्झापूर) ह्यांना पाच वर्षं पूर्ण झाले असताना भारतातील वेब सिरीजच्या छोट्या पण लक्षवेधी इतिहासासंदर्भात आढावा सांगताना आम्हाला आनंद होत आहे,” असे IMDb इंडियाच्या प्रमुख यामिनी पतोडिया यांनी म्हटले. “स्ट्रीमिंग पर्यायांच्या वाढत्या संख्येसह भारतातील वेब सिरीजमध्ये मोठ्या प्रमाणात प्रगती झाली आहे. ह्या यादीसह आम्ही जगातील चाहत्यांना प्रसिद्ध भारतीय वेब् सिरीज बघण्यासाठी व शोधण्यासाठी मदत करत आहोत. चाहत्यांना सर्वोत्तम कंटेंट मिळण्यामध्ये पुढेही आम्ही मदत करत राहू."असंही त्यांनी सांगितलं.


शो चालवणारे आणि सेक्रेड गेम्सचे सह- दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवानी ह्यानी म्हटले, “IMDb युजर्सद्वारे सेक्रेड गेम्सला क्रमांक एकचे स्थान दिल्यात आल्याचे कळाल्यानंतर मला अतिशय अभिमान वाटत आहे आणि आनंद होत आहे. ह्या शोवर प्रेम करणा-या सर्व विशेष चाहत्यांचे मनापासून आभार आणि नेहमीप्रमाणेच अविश्वसनीय सहकारी आणि क्र्यू ह्यांचेही मनापासून आभार व त्यांचेही अभिनंदन.”

IMDb च्या आजवरच्या टॉप 50 सर्वांत प्रसिद्ध भारतीय वेब सिरीज*
1.    सेक्रेड गेम्स
2.    मिर्झापूर
3.    स्कॅम 1992: द हर्षद मेहता स्टोरी
4.    द फॅमिली मॅन
5.    अस्पिरंटस
6.    क्रिमिनल जस्टीस
7.    ब्रीद
8.    कोटा फॅक्टरी
9.    पंचायत
10.    पाताल लोक
11.    स्पेशल ओपीएस
12.    असूर: वेलकम टू यूवर डार्क साईड
13.    कॉलेज रोमान्स
14.    अपहरण
15.    फ्लेम्स
16.    धिंडोरा
17.    फर्जी
18.    आश्रम
19.    इनसाईड एज
20.    अनदेखी
21.    आर्या
22.    गुल्लक
23.    टीव्हीएफ पिचर्स
24.    रॉकेट बॉयज
25.    देल्ही क्राईम
26.    कँपस डायरीज
27.    ब्रोकन बट ब्युटीफूल
28.    जामतारा: सबका नंबर आएगा
29.    ताज़ा खबर
30.    अभय
31.    हॉस्टेल डेझ
32.    रंगबाज़
33.    बंदीश बँडीटस
34.    मेड इन हेव्हन
35.    इममॅच्युअर
36.    लिटल थिंग्ज
37.    द नाईट मॅनेजर
38.    कँडी
39.    बिच्छू का खेल
40.    दहन: राकन का रहस्य
41.    जेएल50
42.    राना नायडू
43.    रे
44.    सनफ्लॉवर
45.    एनसीआर डेज
46.    महारानी
47.    मुंबई डायरीज 26/11
48.    चाचा विधायक हैं हमारे
49.    ये मेरी फॅमिली
50.    अरण्यक

1 जानेवारी 2018 ते 10 मे 2023 मध्ये भारतातील IMDb युजर्सच्या पेज व्ह्यूजच्या रँकिंगनुसार ही यादी IMDbनं तयार केली आहे.

फर्जी, ताज़ा खबर, द नाईट मॅनेजर, आणि राना नायडू या 2023 मध्ये रिलीज झालेल्या  चार वेब सीरिजची नावं या यादीमध्ये आहेत. या यादीतील टॉप 10 सीरिजपैकी सेक्रेड गेम्स, मिर्झापूर, आणि क्रिमिनल जस्टीस या  तीन सीरिजमध्ये पंकज त्रिपाठीने महत्त्वाच्या भूमिका पार पाडल्या. 

Web Title: Imdb announces top 50 all time most popular indian web series list sacred games number one

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.