लॉरेनबद्दल अपशब्द काढणाºयाचे इलियानाने टोचले कान!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2016 16:43 IST2016-06-09T11:13:36+5:302016-06-09T16:43:36+5:30
लॉरेन गॉटलिब ही अमेरिकन कोरिओग्राफर व अॅक्ट्रेस आता पुरती भारतीय झाली आहे. बॉलिवूडमध्ये तिने स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले ...
.jpg)
लॉरेनबद्दल अपशब्द काढणाºयाचे इलियानाने टोचले कान!!
ल रेन गॉटलिब ही अमेरिकन कोरिओग्राफर व अॅक्ट्रेस आता पुरती भारतीय झाली आहे. बॉलिवूडमध्ये तिने स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आहे. लॉरेनने अलीकडे मुंबईत स्वत:चे घर घेतले. अलीकडे इन्स्टाग्रामवर काही जणांनी लॉरेनबद्दल अपशब्दांचा वापर करीत, तिच्यावर अभद्र कमेंट्स केले. लॉरेनची चांगली मैत्रिण असलेली अभिनेत्री इलियाना डिक्रूस हिने या कमेंट्स वाचल्या. त्या वाचून इलियानाला अगदीच राहावले नाही आणि ती लॉरेनच्या बाजूने उभी राहिली. लॉरेनबद्दल अपशब्द काढणाºयांचे इलियानाने चांगलेच कान टोचले. लॉरेन जाणीवपूर्वक स्वत:ला भारतीय असल्याचे भासवते..ती फ्लॉप अॅक्ट्रेस आहे, असे काहीकाही लॉरेनबद्दल बोलले गेले. इलियानाने या सर्वांना चांगलेच सुनावले. लॉरेन भारतीय दिसत असेल तर त्याचा अभिमान बाळगा...असे इलियाना म्हणाली..