येथे आलिया आहे तर कंगनाही आहे! नेपोटिजमवर पहिल्यांदा बोलली करिना कपूर!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2017 10:14 IST2017-09-07T04:44:01+5:302017-09-07T10:14:01+5:30
आयफा अवार्ड्समध्ये सैफ अली खान, करण जोहर आणि वरूण धवन यांच्या ‘नेपोटिजम रॉक्स’ या विनोदाने मोठा वाद निर्माण केला ...
.jpg)
येथे आलिया आहे तर कंगनाही आहे! नेपोटिजमवर पहिल्यांदा बोलली करिना कपूर!!
आ फा अवार्ड्समध्ये सैफ अली खान, करण जोहर आणि वरूण धवन यांच्या ‘नेपोटिजम रॉक्स’ या विनोदाने मोठा वाद निर्माण केला होता. अर्थात गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडमध्ये नेपोटिजम अर्थात घराणेशाहीवर चर्चा सुरु आहे. पण पहिल्यांदा कंगना राणौतने यावर मोकळेपणे मत मांडले आणि मग या वादाला चांगलेच तोंड फुटले. काहींनी कंगनाच्या मताचे जोरदार समर्थन केले तर काहींनी तितकाच प्रखर विरोधही.
आता या वादावर करिना कपूरने प्रथमच आपले मत मांडले आहे. करिनाच्या मते, नेपोटिजम प्रत्येक प्रोफेशनमध्ये आहे. पण बॉलिवूडमध्ये नेपोटिजम असले तरी त्यापेक्षाही महत्त्वाचे आहे, तुमच्यातील टॅलेंट. करिनाच्या मते, इंडस्ट्रीत रणबीर कपूर आहे तर रणवीर सिंह सुद्धा आहे. आलिया भट्ट आहे तर कंगना राणौत सुद्धा आहे.
बॉलिवूडमधील सर्वांत प्रसिद्ध ‘कपूर खानदान’ची लेक असलेल्या करिनाने अलीकडे एका मॅगझिनला मुलाखत दिली. या मुलाखतीत ती नेपोटिजमवर बोलली. ‘ नेपाटिजम या विषयावर बरेच काही बोलता येऊ शकते. नेपोटिजम सगळीकडेच आहे. पण त्याबद्दल कुणीही बोलत नाही. बिझनेसमध्ये नवी पिढी बिझनेस सांगभाळते. राजकीय नेत्यांची मुले-मुली त्यांचा राजकीय वारसा चालवतात. माझ्या मते, प्रत्येकवेळी यास ‘घराणेशाही’च्या श्रेणीत ठेवता येणार नाही. खरे सांगायचे तर, बॉलिवूडमधील नेपोटिजमवर चर्चा व्यर्थ आहे. कारण इथे स्टारकिड्स असल्याने संधी असली तरी या संधीचे सोने करण्यासाठी टॅलेंट सर्वाधिक महत्त्वाचे आहे. अनेक स्टारकिड्स आलेत आणि गेलेत. स्टारकिड्स हा एक निकष असता तर अनेक स्टारकिड्स नंबर1 पोझिशनवर असते. पण असे नाहीयं. येथे केवळ टॅलेंट आणि टॅलेंटचं टिकते. येथे रणबीर आहे तर रणवीर आहे. त्यामुळे येथील नेपोटिजमवर बोलणे माझ्यामते, अप्रामाणिकपणा ठरेल, असे करिना यावेळी म्हणाली. करिनाचे हे विचार तुम्हा किती पटतात, किती नाही, ते आम्हाला नक्की कळवा.
ALSO READ : मम्मा करिना कपूरलाही कळेना, का रडतोय तैमूर?