​ सलमान खान -सोनाक्षी सिन्हाला एकत्र पाहण्यास उत्सूक असाल तर हे वाचा !!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2017 11:56 IST2017-07-17T06:26:44+5:302017-07-17T11:56:44+5:30

‘दबंग’ चित्रपटाचे चाहते ‘दबंग3’ची आतुरतेने प्रतीक्षा करीत आहेत. तुम्हीही या यादीत सामील असाल, तर नक्कीच तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी ...

If Salman Khan and Sonakshi Sinha are keen to see you together, then read this !! | ​ सलमान खान -सोनाक्षी सिन्हाला एकत्र पाहण्यास उत्सूक असाल तर हे वाचा !!

​ सलमान खान -सोनाक्षी सिन्हाला एकत्र पाहण्यास उत्सूक असाल तर हे वाचा !!

बंग’ चित्रपटाचे चाहते ‘दबंग3’ची आतुरतेने प्रतीक्षा करीत आहेत. तुम्हीही या यादीत सामील असाल, तर नक्कीच तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. सोनाक्षी सिन्हा ‘दबंग3’मध्ये असणार की नाही,यावरून गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे. आधी सोनाक्षी या चित्रपटात नसणार, अशी खबर आली. यानंतर सोना यात असेल पण एकट्या-दुकट्या सीन्समध्ये, असे कानावर आले. निश्चितपणे या बातम्या ऐकून सोना व सलमान खानला एकत्र पाहण्यासाठी उत्सुक असलेल्यांची निराशा झाली. पण आता निराश होण्याची गरज नाही. होय, सोना व सलमानची जोडी एकत्र पाहण्यास तुम्ही उत्सुक असाल तर आमच्याकडे तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ‘दबंग3’पूर्वी ही जोडी अन्य एका चित्रपटात एकत्र दिसणार आहे. एवढेच नव्हे तर सोनाक्षी व सलमान या दोघांनी या चित्रपटाचे शूटींगही सुरु केले आहे. आश्चर्य वाटले ना? पण हे खरे आहे.

आयफा अवार्डचे आॅर्गनायझर्स (विजक्रॉफ्ट एंटरटेनमेंट) आयफावर एक चित्रपट बनवत आहेत. यात सोनाक्षी सिन्हा व दिलजीत दोसांज मुख्य भूमिकेत असणार आहेत. तर सलमान खान कॅमिओ करणार आहे. सलमानशिवाय करण जोहर, आदित्य राय कपूर आणि बोमन इरानी हेही यात कॅमिओ करताना दिसतील. आयफाच्या ग्रीन कार्पेटवर बोलताना सलमानने या वृत्तास दुजोरा दिला. मी आयफा अवार्डसाठी न्यूयॉर्कला आलो, तेव्हापासून यावर काम सुरू आहे. वासू भगनानी व आयफासाठी मी एक कॅमिओ शूट केला. हा चित्रपट आयफावर आधारित आहे. आता तो कसा असेल, हे आपण बघू, असे सलमान म्हणाला. सोनाक्षीनेही या वृत्ताला दुजोरा दिला. 

Web Title: If Salman Khan and Sonakshi Sinha are keen to see you together, then read this !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.