'आईस वॅाटर'ची बाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 10:41 IST2016-01-16T01:07:17+5:302016-02-10T10:41:37+5:30

चौदाव्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाने भारतातीलच नव्हे, तर आशियाई देशांमधील अन्य महोत्सवांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. ...

'Ice Walker' bet | 'आईस वॅाटर'ची बाजी

'आईस वॅाटर'ची बाजी

दाव्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाने भारतातीलच नव्हे, तर आशियाई देशांमधील अन्य महोत्सवांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. यंदाच्या चौदाव्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवात वैविध्यपूर्ण चित्रपटांची व लघुपटांची मेजवानी देत रसिकांना आशियाई चित्रपट संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. यंदा सुमारे ६0 हून अधिक चित्रपट व लघुपट रसिकांना पाहायला मिळाले. महोत्सवाचा समारोप इजिप्तच्या केरिओ टाईम या चित्रपटाने झाला.
यंदाच्या लघुपट स्पर्धा विभागात नव्या दमाच्या दिग्दर्शकांच्या नव्या पद्धतीची मांडणी करणारे लघुपट रसिकांना पाहायला मिळाले. इराणचा 'आईस वॅाटर' हा लघुपट यंदाचा सर्वोत्कृष्ट लघुपट ठरला असून स्पेशल ज्युरी अँवॅार्ड ब्रोकन इमेज या कन्नड चित्रपटाला मिळाला. २४ ते ३१ डिसेंबरदरम्यान रंगलेल्या या महोत्सवात अभिनय क्षेत्रातील अद्वितीय योगदानाबद्दल विशेष पुरस्काराने ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान यांना सन्मानित करण्यात आले. या महोत्सवाला रसिकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला.

Web Title: 'Ice Walker' bet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.