..तरी काही मला फरक पडणार नाही : आमिर खान
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2016 19:01 IST2016-11-12T19:01:10+5:302016-11-12T19:01:10+5:30
पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटांवर बंदी आणल्याने माझ्या चित्रपटावर फरक पडला तरी मला कोणताही त्रास होणार नाही असे ...

..तरी काही मला फरक पडणार नाही : आमिर खान
एका वृत्तसंस्थेनुसार, लोकांना फार कमी वेळासाठी अडचणींचा सामना करावा लागणार आहे, मात्र असे करणे देशासाठी गरजेचे होते. चलनातील नोटांवर बंदी आणल्याने माझ्या चित्रपटाच्या कमाईवर परिणाम झाला तरी मला दु:ख नसेल, असे आमिर याने सांगितले आहे. आमिर खानचा आगामी ‘दंगल’ हा चित्रपट २५ डिसेंबरला देशभरात प्रदर्शित होत असल्याने त्याचे हे मत महत्त्वाचे ठरते.
पंतप्रधान मोदी यांनी काळ्या पैशावर नियंत्रण आणण्यासाठी एक हजार रुपयांच्या व पाचशे रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. लोकांनी चलन बदलून घेण्याचे आवाहनही पंतप्रधान मोदी यांनी केले होते. मात्र चार दिवस झाल्यावरही लोकांना मर्यादित पैशांचा पुरवठा होत असल्याने याचा जनमाणसांवर परिणाम दिसू लागला आहे. बॉलिवूडमध्येही यामुळे खळबळ माजली असून अनेक रिलीज झालेल्या चित्रपटांचे कलेक्शन कमी झाले आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘रॉक आॅन २’च्या बॉक्स आॅफिस कलेक्शनवर परिणाम दिसून येत आहे. दुसरीकडे ‘ऐ दिल हे मुश्किल’ व ‘शिवाय’ची १०० कोटीकडील वाटचाल ठप्प झाली आहे.
आमिर खान याची प्रमुख भूमिका असलेला ‘दंगल’ हा चित्रपट पहेलवान महावीर सिंग फोगट व त्यांच्या मुलींच्या कुश्तीच्या वाटचालीवर आधारित आहे. यात आमिर महावीर सिंग फोगटची भूमिका साकारताना दिसणार आहे.
What people are facing is shot term problem, it is imp for India. I've no problem even if it affects my film: Amir Khan on #DeMonetisation— ANI (@ANI_news) November 12, 2016 ">http://
}}}}What people are facing is shot term problem, it is imp for India. I've no problem even if it affects my film: Amir Khan on #DeMonetisation— ANI (@ANI_news) November 12, 2016