​मी पागलखान्यात होतो! कॉमेडियन सिद्धार्थ सागरचा धक्कादायक खुलासा!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2018 11:01 IST2018-04-01T05:31:31+5:302018-04-01T11:01:31+5:30

कपिल शर्माच्या शोमधील ‘सेल्फी मौसी’ म्हणतेच कॉमेडीयन सिद्धार्थ सागर बेपत्ता असल्याची बातमी येताच, याबाबत रोज नवे खुलासे होत आहे. अलीकडे सिद्धार्थने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करून आपल्या कुटुंबीयांवर अनेक आरोप केले होते. आता सिद्धार्थने ताज्या मुलाखतीत एक वेगळाच खुलासा केला आहे.

I was in a mad house! Comedian Siddhartha Sagar's shocking disclosure !! | ​मी पागलखान्यात होतो! कॉमेडियन सिद्धार्थ सागरचा धक्कादायक खुलासा!!

​मी पागलखान्यात होतो! कॉमेडियन सिद्धार्थ सागरचा धक्कादायक खुलासा!!

िल शर्माच्या शोमधील ‘सेल्फी मौसी’ म्हणतेच कॉमेडीयन सिद्धार्थ सागर बेपत्ता असल्याची बातमी येताच, याबाबत रोज नवे खुलासे होत आहे. अलीकडे सिद्धार्थने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करून आपल्या कुटुंबीयांवर अनेक आरोप केले होते. आता सिद्धार्थने ताज्या मुलाखतीत एक वेगळाच खुलासा केला आहे. होय, मी पागलखान्यात होतो, असे सिद्धार्थने म्हटले आहे. माझ्या कुटुंबात संपत्तीवरून वाद सुरु असल्याचेही सिद्धार्थने स्पष्ट केले आहे.



SpotboyE ला दिलेल्या मुलाखतीत सिद्धार्थने हा खुलासा केला. मी पागलखान्यात होतो. या पागलखान्यात रूग्णांना शॉक ट्रिटमेंट दिली जात होती. मी डिप्रेशनमध्ये चाललो होतो. आत्ता मी कुठे आहे, हे कुणालाही ठाऊक नाही. पण सध्या मी ज्यांच्यासोबत आहे, त्यांनी मला या संकटातून बाहेर काढण्यासाठी मदत केली. मी पागलखान्यात असताना, अनेकांना मदतीसाठी गयावया केली. मी पागलखान्यात आहे, हे माझ्या मित्रांना सांगा, अशी विनंती मी त्यांना केली. पण त्यांनी माझी मदत केली नाही. पागलखान्यात एक मुलगी मला औषधं द्यायची. यानंतर मी माझे मानसिक संतुलन गमावून बसायचो. मी माझे कुटुंब व काही नातेवाईकांविरोधात एनसी(अदखलपात्र गुन्हा)  दाखल केली होती. पण मी पागलखान्यात असताना त्यांनी ती एनसीगायब केली. गेल्या वर्षभरात मी खूप काही भोगले. मी कुणाच्याही संपर्कात नव्हतो. मनातून प्रचंड घाबरलो होतो. मी गायब झाल्याने अनेक अडचणी आल्यात. मी आपल्या मॅनेजरशी बोललोय. लवकरच पत्रपरिषद घेऊन मी मीडियाच्या सर्व प्रश्नांना उत्तरे देईल, असे सिद्धार्थ म्हणाला.



सोशल मीडियावर सिद्धार्थने एक व्हिडिओ पोस्ट केला होता. या त्याने आपबीती सांगितलीयं. मला मीडिया व मित्रांचे सारखे फोन येत आहेत. मी ठीक आहे की नाही, हे त्यांना जाणून घ्यायचे आहे. मी खूप तणावातून गेलो आहे. माझ्या कुटुंबाविरोधात मी एनसी(अदखलपात्र गुन्हा) दाखल केला होता. यानंतर कुटुंबाने माझा छळ सुरु केला, असे त्याने त्यात म्हटलेयं.
सिद्धार्थने कृष्णा अभिषेक, सुदेश लेहरी यांच्यासोबत स्टेज शेअर केला आहे.कॉमेडी सर्कस,लाफ्टर के फटके, कॉमेडी सर्कस के अजुबे यांसारख्या कार्यक्रमांमुळे तो घराघरात पोहोचला. कॉमेडी नाइट्स लाईव्हया शो दरम्यान भारतीशी भांडण झाल्यानंतर सिद्धार्थला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. एका एपिसोडदरम्यान सिद्धार्थलाभारतीच्या श्रीमुखात मारायची होती. मात्र सिद्धार्थने ती जोरात मारली. कार्यक्रम संपल्यानंतर याची तक्रार भारतीने प्रोडक्शनकडे केली. यानंतर भारती आणि सिद्धार्थने एकमेकांशी बोलणं बंद केले. 

Web Title: I was in a mad house! Comedian Siddhartha Sagar's shocking disclosure !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.