मला रोज स्वत:ला सिद्ध करावे लागले...! राणी मुखर्जी झाली भावूक!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2018 14:00 IST2018-03-22T08:30:40+5:302018-03-22T14:00:40+5:30
काल २१ मार्चला बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी हिचा वाढदिवस साजरा झाला आणि उद्या २३ मार्चला राणीचा ‘हिचकी’ हा चित्रपट रिलीज होतोयं. या संपूर्ण पार्श्वभूमीवर राणीने एक खुले पत्र लिहिले आहे.
.jpg)
मला रोज स्वत:ला सिद्ध करावे लागले...! राणी मुखर्जी झाली भावूक!!
क ल २१ मार्चला बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी हिचा वाढदिवस साजरा झाला आणि उद्या २३ मार्चला राणीचा ‘हिचकी’ हा चित्रपट रिलीज होतोयं. हा चित्रपट राणीसाठी बराच खास आहे. कारण आई झाल्यानंतरचा राणीचा हा पहिला चित्रपट आहे. या संपूर्ण पार्श्वभूमीवर राणीने एक खुले पत्र लिहिले आहे. या खुल्या पत्रात राणीने काय लिहिले असावे? तर बॉलिवूडमध्ये महिलांना मिळणा-या पक्षपाती वागणुकीविरोधात आवाज उठवला आहे.
‘वयाची चाळीशी गाठून मी आनंदी आहे. २२ वर्षे इंडस्ट्रीत काम करण्याचा अनुभवही चांगला राहिला. या काळात मला बरीच प्रशंसा व प्रेम मिळाले, यासाठी मी स्वत:ला नशिबवान समजते. माझा जन्म केवळ अभिनेत्री बनण्यासाठीच झाला होता, हे मला अनेक वर्षांनंतर उमगले. पण एक महिला या नात्याने बॉलिवूडचा हा प्रवास माझ्यासाठी सोपा नव्हताचं. मला प्रत्येक दिवशी स्वत:ला सिद्ध करावे लागले. बॉलिवूडमध्ये अभिनेत्रींना स्वत:ला रोज सिद्ध करावे लागते. बॉलिवूडमधील महिलांचे करिअर बरेच लहान असते. विवाहित महिलांसाठी तर ते आणखीच कठीण होते. महिलाप्रधान चित्रपट (मी या शब्दाचा तिरस्कार करते.) येथे मोठी जोखिम मानली जाते. विवाहित नट्या ज्या आई आहेत, त्यांची स्वप्नं, महत्त्वाकांक्षा, अपेक्षा सगळे काही पक्षपातीपणाच्या भक्ष्यस्थानी पडतात. मी लग्नानंतर आणि आता आई बनल्यानंतर अभिनय सुरू ठेवून या पक्षपाती मानसिकतेला आव्हान दिले आहे. मी वचन देते की, यापुढेही मी हे काम सुरू ठेवेल,’असे राणीने लिहिले आहे.
सुरूवातीच्या करिअरमध्ये उंची आणि आवाज यावरून राणीला बरीच टीका व नकार पचवावी लागली. एका चित्रपटात तर आमिर खानला राणीचा आवाज आवडला नव्हता. अर्थात ‘कुछ कुछ होता है’नंतर आमिरने राणीची माफी मागितली होती.
२१ एप्रिल २०१४ रोजी राणीने आदित्य चोप्रासोबत लग्न केले होते. राणी व आदित्यला आदिरा नावाची एक मुलगी आहे.