आय डोन्ट लाईक रिअॅलिटी शो
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2016 18:45 IST2016-12-14T18:45:25+5:302016-12-14T18:45:25+5:30
सतीश डोंगरे ग्लॅमरस, पैसा, झटपट हे संपूर्ण पॅकेज हवे असेल तर ‘रिअॅलिटी शो’सारखे दुसरे माध्यम नाही. त्यामुळेच छोट्या-मोठ्या पडद्यावरील ...
.jpg)
आय डोन्ट लाईक रिअॅलिटी शो
ग्लॅमरस, पैसा, झटपट हे संपूर्ण पॅकेज हवे असेल तर ‘रिअॅलिटी शो’सारखे दुसरे माध्यम नाही. त्यामुळेच छोट्या-मोठ्या पडद्यावरील कलाकार तसेच सुपरस्टार्स मंडळीदेखील रिअॅलिटी शोच्या मोहापासून कधीच लपून राहिलेले नाहीत. मात्र अभिनेत्री रसिका दुग्गल यास अपवाद आहे. कारण तिला रिअॅलिटी शो अजिबात आवडत नाहीत. ती कुठल्याही रिअॅलिटी शोला फॉलो करीत नसून, तिला हे शो बघणेही जिवावर येते. तिच्या मते, अशाप्रकारच्या शोमधून मला एकमेकांशी स्पर्धा करणे किंवा त्यांचे उणे-दुणे काढण्यास मला अजिबात आवडत नाही, त्यामुळेच मी अद्यापपर्यंत रिअॅलिटी शोपासून दूर राहिलेली आहे. ‘पीओडब्ल्यू’ या सैनिकांच्या जीवनावर आधारित असलेल्या मालिकेत एंट्री करणाºया रसिकाशी ‘सीएनएक्स’ने संवाद साधला असता तिने रिअॅलिटी शोबरोबरच तिच्या करिअरच्या वाटचालीबाबत मनमोकळा संवाद साधला.
प्रश्न : तुला रिअॅलिटी शो आवडत नाहीत, मग या शोमध्ये काम करणाºया कलाकारांप्रती तुझे मत काय?
- या प्रश्नाचे एका वाक्यात उत्तर द्यायचे झाल्यास, ‘मला रिअॅलिटी शोमध्ये काम करणाºया कलाकारांचा प्रचंड आदर वाटतो’ परंतु व्यक्तिगत स्तरावर रिअॅलिटी शोपासून चार हात लांब राहायला आवडते. माझ्या मते रिअॅलिटी शोमध्ये भाग घेण्यासाठी स्वत:मध्ये प्रचंड आत्मविश्वास असायला हवा. जो माझ्यामध्ये नाही. कारण रिअॅलिटी शोमध्ये एकमेकांचा पाय ओढण्याची ताकद असायला हवी. जे मी कधीच करू शकत नाही. जेव्हा मला रिअॅलिटी शोमध्ये घडलेले काही किस्से ऐकायला मिळतात तेव्हा मी विचार करते की, रिअॅलिटी शोमध्ये असे घडूच कसे शकते. कधी-कधी तर रडायलाही येते.
प्रश्न : ‘बिग बॉस’ या शोविषयी तुझे मत काय?
- बरेचसे कलाकार बिग बॉस या शोचा भाग बनण्यासाठी धडपड करीत असतात. परंतु मी या शोमध्ये कधीच सहभागी होऊ इच्छित नाही. कारण मला असे वाटते की, अशाप्रकारच्या शोमध्ये सहभागी होण्यासाठी धाडस असायला हवे, जे माझ्यात नाही. द्वेष, मत्सर, राग, भांडण अशा वातावरणात या शोमध्ये राहणाºया कलाकारांचे खरं तर कौतुकच करायला हवे.
प्रश्न : ‘पीओडब्ल्यू’मधील संधीबाबत काय सांगशील?
- ‘पीओडब्ल्यू’ या मालिकेविषयी बोलण्याअगोदर मला ‘चटणी’ या वेब सीरिजचा अनुभव सांगायला आवडेल. कारण टीस्का चोपडा निर्मित या वेब सीरिजमध्ये मला आॅडिशन न देताच संधी मिळाली होती. पुढे याच वेब सीरिजमुळे मला निखिल अडवानी यांनी पीओडब्ल्यूमध्ये संधी दिली. खरं तर आॅडिशन न देताच मला एवढ्या चांगल्या भूमिका साकारायला मिळत आहेत. याचा अर्थ आॅडिशनला सामोरे जाऊ नये असा होत नाही. तुमची भूमिका ही आॅडिशनमधूनच ठरत असते. परंतु मला मिळत असलेल्या संधीमुळे मी आनंदी आहे.
प्रश्न : तू बºयाचशा ‘शॉर्ट फिल्मस्’ केल्या आहेत, काय अनुभव सांगशील?
- ‘चटणी, स्कूल बॅग’ यांसारख्या शॉर्ट फिल्मस्मध्ये काम करताना एक गोष्ट माझ्या निदर्शनास आली, ती म्हणजे शॉर्ट फिल्मस्मध्ये काम करताना बारीक-सारीक गोष्टींचा विचार करावा लागतो. शॉर्ट फिल्मस्ची कथा बहुधा विचार करण्यास भाग पाडणारी असल्याने तुम्हाला फारशा सोयीसुविधांव्यतिरिक्त वातावरण निर्मिती करावी लागते. डायलॉगपासून, देहबोलीपर्यंत तुमच्या अभिनयाचा कस लागतो. मोबाइलवर शॉर्ट फिल्म बघणारा प्रेक्षक अधिक असल्याने अभिनयातील दमदारपणा अखेरच्या क्षणापर्यंत कायम ठेवावा लागतो. थोडक्यात शॉर्ट फिल्मस्मध्ये काम करणे हे कठीण असल्याचे मला पावलोपावली जाणवले आहे.
प्रश्न : इरफान खाननंतर नवाजुद्दीन सिद्दीकी याच्याबरोबर काम करण्याचा तुझा अनुभव कसा होता?
- मला वैचारिक आणि बुद्धिमान कलाकार तथा दिग्दर्शकांसोबत काम करण्याची सुरुवातीपासूनच आवड आहे. सुदैवाने मला ही संधी मिळत आहे. इरफान खानसोबत काम केल्याने मला बºयाचशा गोष्टी शिकता आल्या. आता नवाजुद्दीनसोबत काम करायला मिळाल्याने मी आनंदी आहे. आम्ही ‘मंटो’ या चित्रपटात काम करीत असून, नवाजुद्दीन मंटोच्या तर मी त्याची पत्नी साफिया हिच्या भूमिकेत आहे. नवाजुद्दीन एक गुणी कलाकार असून, त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव करिअरचा आलेख वाढविणारा आहे.
प्रश्न : व्यावसायिक चित्रपटांपासून दूर राहण्याचे काय कारण?
- मी स्वत:ला मनाला भावणाºया चित्रपटांमध्ये बघणे पसंत करतेय. मी कुठल्याही पद्धतीचे काम करण्यास नेहमी तयार असते. माझ्यादृष्टीने कुठलीच भूमिका लहान किंवा मोठी नाही. कारण प्रत्येक भूमिकेतून मी काही ना काही शिकण्याचा प्रयत्न करीत असते. त्यामुळे वाट्याला आलेल्या भूमिकेला न्याय कसा देता येईल, याचदृष्टीने माझा प्रयत्न असतो. मी करीत असलेल्या भूमिका या व्यावसायिक चित्रपटांप्रमाणेच आहेत, असे मला वाटते.