‘मी ‘फेम’ वर अवलंबून नाही ’ - इरफान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2016 09:40 IST2016-10-27T17:23:07+5:302016-10-28T09:40:46+5:30

इरफान खान याची ओळख केवळ भारतीय कलाकार म्हणूनच नव्हे तर हॉलिवूड अभिनेता म्हणूनही करण्यात येते. त्याचा अभिनय, पर्सनॅलिटी, चित्रपटांची ...

'I am not dependent on' fame '- Irfan | ‘मी ‘फेम’ वर अवलंबून नाही ’ - इरफान

‘मी ‘फेम’ वर अवलंबून नाही ’ - इरफान

फान खान याची ओळख केवळ भारतीय कलाकार म्हणूनच नव्हे तर हॉलिवूड अभिनेता म्हणूनही करण्यात येते. त्याचा अभिनय, पर्सनॅलिटी, चित्रपटांची निवड यांच्यामुळे त्याची  एक उत्तम अभिनेता म्हणून नावलौकिक आहे. सर्वत्र एवढे त्याचे कौतुक होतानाही त्याला त्याच्या फेमबद्दल कुठलाच गर्व नाहीये. 

याविषयी बोलताना तो म्हणतो,‘ मला फेमवर अवलंबून राहायचे नाही. मला केवळ कथानक किंवा भूमिका महत्त्वाची वाटते. ती जगाच्या कानाकोपºयापर्यंत पोहोचली पाहिजे. एक दिवस माझ्यासाठी फेम देखील महत्त्वाची नसेल. प्रेक्षकांसोबत शेअर करायला माझ्याकडे स्टोरीज आहेत. पण त्या चाहत्यांपर्यंत पोहोचत आहेत की नाहीत याकडे मला लक्ष द्यायला हवे. एखाद्या कलाकारासाठी केवळ ती भूमिका महत्त्वाची असते. जिच्यासाठी तो स्वत:ला झोकून देतो. भूमिकेचे कौतुक झाले तरच त्या कलाकाराचे कौतुक होते असे समजावे लागेल.’
 
‘पानसिंग तोमर’,‘तलवार’,‘मकबूल’, ‘७ खुन माफ’ या हिंदी चित्रपटात त्याने उत्तम अभिनय साकारला आहे. तसेच हॉलीवूडच्या ‘द नेमसेक’,‘लाईफ आॅफ पाय’, ‘स्लमडॉग मिलेनियर’,‘ दि अमेझिंग स्पायडर मॅन’,‘इन्फर्नाे’ या चित्रपटांमध्ये त्याने उत्तम अभिनयाचे सादरीकरण केले आहे. 

Web Title: 'I am not dependent on' fame '- Irfan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.