हृतिकची पिसाळलेल्या बैलासोबत ‘बाहुबली स्टाईल’ झुंज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2016 21:03 IST2016-03-03T04:03:15+5:302016-03-02T21:03:15+5:30

आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित हृतिक रोशन चित्रीत ‘मोहंजोदारो’ चित्रपट सध्या खुप चर्चेत आहे. एकतर हा चित्रपट बिगबजेट असून आशुतोष गोवारीकरचा ...

Hrithik's 'Baubbuli Style' bilateral battle with a screwed bullock! | हृतिकची पिसाळलेल्या बैलासोबत ‘बाहुबली स्टाईल’ झुंज!

हृतिकची पिसाळलेल्या बैलासोबत ‘बाहुबली स्टाईल’ झुंज!

ुतोष गोवारीकर दिग्दर्शित हृतिक रोशन चित्रीत ‘मोहंजोदारो’ चित्रपट सध्या खुप चर्चेत आहे. एकतर हा चित्रपट बिगबजेट असून आशुतोष गोवारीकरचा हा ड्रीम प्रोजेक्ट असल्याचे बोलले जात आहे. 
bahubali

bahubali
काही दिवसांपूर्वी, हृतिक मगरींना मारतांनाचे काही फोटोज ‘मोहंजादारो’ च्या सेटवरून लीक करण्यात आले होते. आता तुम्ही म्हणाल, यात नवीन काय? तर आता हृतिक चक्क पिसाळलेल्या बैलाला थोपवतांना दिसणार आहे. एकदम बाहुबली स्टाईल! राना दग्गुबती जसा बाहुबली चित्रपटात पिसाळलेल्या बैलाला थोपवत असतो. अगदी तसाच हा सीन आहे. हा सीन जास्त कठीण असल्याचे कळते कारण, चित्रपटाची अभिनेत्री पूजा हेगडे याच सीनला हृतिकला प्रथम पाहणार आहे. वेल, आता ते लव्ह अ‍ॅट फर्स्ट साईट देखील असू शकते. 

hritik
चित्रपटात अ‍ॅक्शन सिक्वेन्स बरेच असल्याचे कळते. यासोबतच हृतिक वाघासोबतही फाईटिंग करताना दिसणार आहे. थोडक्यात काय, आशुतोष गोवारीकरचा चित्रपट आणि त्यात थ्रिल नाही असे कसे होईल! चित्रपट केव्हा रिलीज होतोय असे झालेय आता....

Web Title: Hrithik's 'Baubbuli Style' bilateral battle with a screwed bullock!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.