हृतिक सुरु करणार नवी इनिंग?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2016 13:07 IST2016-11-03T13:07:55+5:302016-11-03T13:07:55+5:30
बॉलिवूडमध्ये आघाडीचा अभिनेता अशी ओळख निर्माण करणारा हृतिक रोशन लवकरच आयुष्याला कलाटणी देणारा निर्णय घेऊ शकतो. होय,हृतिक लवकरच अभिनेत्याचा ...

हृतिक सुरु करणार नवी इनिंग?
ब लिवूडमध्ये आघाडीचा अभिनेता अशी ओळख निर्माण करणारा हृतिक रोशन लवकरच आयुष्याला कलाटणी देणारा निर्णय घेऊ शकतो. होय,हृतिक लवकरच अभिनेत्याचा दिग्दर्शक बनू शकतो. अर्थात हृतिक याबद्दल काहीही बोललेला नाही. पण हृतिकचे लाडके पप्पा अर्थात राकेश रोशन यांनी एका मुलाखतीत याबाबतचे संकेत दिले आहेत. मला मदत करत करत हृतिकने त्याचे करिअर सुरु केले आणि याचदरम्यान अभिनेता म्हणून बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली. सेलिब्रिटींची मुलं अस्टिस्टंट डायरेक्टर म्हणून सुरुवात करतात. त्यातून बरेच काही शिकून पुढे अभिनयाला आपलेसे करतात. नेमका हाच ट्रेंड हृतिकने पुढे नेला. हृतिकने आज अभिनेता म्हणून स्वत:ची एक स्वतंत्र ओळख निर्माण केलीय. पण अभिनयाइतकाच त्याला दिग्दर्शनातही रस आहे. कलात्मक दिग्दर्शन करण्याकडे त्याचा ओढा आहे. कदाचित लवकरच तो त्याचा स्वत:चा चित्रपट दिग्दर्शित करतानाही दिसू शकेल. ‘कहो ना प्यार है’मधून बॉलिवूड डेब्यू करण्यापूर्वी माझ्या बºयाच चित्रपटांसाठी हृतिकने अस्टिस्ट केले. माझ्या मते, तो दिग्दर्शक म्हणून एका नव्या करिअरची सुरुवात करायची झाल्यास तो त्यासाठी अगदी तयार आहे, असे राकेश रोशन या मुलाखतीत म्हणाले.
‘मोहेंजोदडो’ आपटल्यानंतर हृतिक लवकरच संजय गुप्ता दिग्दर्शित ‘काबील’मध्ये दिसणार आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनात काहीप्रमाणात हृतिकचाही सहभाग असल्याची चर्चा आधीपासूनच रंगते आहे. चित्रपटाच्या काही महत्त्वपूर्ण सीन्ससाठी हृतिकने संजय गुप्ता यांना काही सल्ले दिल्याचे ऐकू येतेय. आता यात तथ्य किती, हे माहिती नाही. पण पप्पांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला तर यात तथ्य आहे, असेच मानले पाहिजे. शिवाय हृतिकला त्याच्या नव्या इनिंगसाठी शुभेच्छाही दिल्या पाहिजेत.