हृतिक म्हणाला, शाहरुखने केले बॉलिवूडमध्ये स्वबळावर स्थान
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2016 16:19 IST2016-11-12T17:05:01+5:302016-12-01T16:19:50+5:30
बॉलिवूडमध्ये शाहरुख खानने स्वबळावर व मेहनतीने स्टारडम मिळविले आहे. त्याची पार्श्वभूमी सिनेमाची नाही. करिअर घडविण्यासाठी बॉलिवूडचे बॅकग्राऊंड फायदेशीर ठरते ...

हृतिक म्हणाला, शाहरुखने केले बॉलिवूडमध्ये स्वबळावर स्थान
हृतिक रोशन हा लखनौ येथे आयोजित ‘हिंदुस्थान शिखर समागम -२०१६’मध्ये घेतलेल्या मुलाखतीत बोलत होता. स्टारकिड्सना मिळणाºया संधीबाबत हृतिक म्हणाला, संधी तर मिळतेच पण यश मिळविणे हे कुुटुंबाच्या हाती नसते. कॅमेºयासमोर तुम्ही एकटेच असता. शेवटी तुम्हाला तुमचे टॅलेंटच कामी येते. मला असे वाटते टॅलेंट पाण्यासारखे असते. तो आपला मार्ग निवडतोच. तेव्हाच बॉलिवूडकडे शाहरुखसारखे उदाहरण आहे. शाहरुखला सिनेमासृष्टीचा बॅकग्राऊंड नव्हताच. तरी तो स्टार झाला आणि अनेक स्टारकिड असे आहेत ज्यांना यश मिळालेले नाही. मला यात अजिबात विश्वास नाही की स्टारकिड असाल तरच यश मिळेल.
हृतिक म्हणाला, मी आजपर्यंत ज्या चित्रपटात काम केले आहे, ते हिट झाले नाहीत याची मला खंत नाही. रिलीजच्या पूर्वी आम्हाला अंदाज येतो की चित्रपट बॉक्स आॅफिसवर कसा परफॉर्म करणार. माझा अंदाज जवळजवळ खरा ठरतो. यामुळे अपयश पचविणे सोपे जाते. मी चुकांमधून शिकत जातो. शाहरुख आपले चित्रपट फ्लॉप झाल्यावर खूप रडतो, तू ही असाच करतो काय? या प्रश्नाच्या उत्तरात हृतिक म्हणाला, मी असे काहीच करीत नाही. निराशा होते, मात्र प्रत्येक वेळी नवे काही शिकायला मिळते. सत्य स्वीकारले तर फायदाच होतो.
बॉलिवूडमध्ये ३० मध्ये असलेला युवक मोठा स्टार होत नाही यावर हृतिक म्हणाला, वयानुसार यश मिळायला हवे हे मी मानत नाही. नवीन तरुणही चांगले काम करीत आहेत. यश आणि वयाचा संबध नाही. जर तुम्ही मनाने तरुण आहात, तर तुम्ही ९० वर्षाचे असतानाही गाणे गाऊ शकता व डान्स करू शकता.