‘ही’ टीव्ही अभिनेत्री बनणार हृतिक रोशनची पत्नी, जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2018 21:25 IST2018-03-17T15:01:30+5:302018-03-17T21:25:16+5:30

बॉलिवूडचा सुपरहिरो हृतिक रोशन सध्या त्याच्या आगामी ‘सुपर ३०’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. अशात एक बातमी समोर येत ...

Hrithik Roshan's wife, will become a TV actress! | ‘ही’ टीव्ही अभिनेत्री बनणार हृतिक रोशनची पत्नी, जाणून घ्या!

‘ही’ टीव्ही अभिनेत्री बनणार हृतिक रोशनची पत्नी, जाणून घ्या!

लिवूडचा सुपरहिरो हृतिक रोशन सध्या त्याच्या आगामी ‘सुपर ३०’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. अशात एक बातमी समोर येत आहे की, हृतिक टीव्ही जगतातील एका सुंदर अभिनेत्रीचा पती बनणार आहे. अखेर ही लकी अभिनेत्री कोण? असा सध्या प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. बातमी वाचून धक्का बसला ना? पण कुठल्याही निर्णयापर्यंत पोहोचण्याअगोदर खाली दिलेल्या माहिती वाचा. 

या लकी अभिनेत्रीचे नाव मृणाल ठाकूर आहे. मृणालने ‘कुम कुम भाग्य’ या अत्यंत लोकप्रिय मालिकेत प्रज्ञाची लहान बहीण बुलबुलची भूमिका साकारली आहे. वृत्तानुसार, मृणाल हृतिक रोशनच्या आगामी ‘सुपर-३०’ या चित्रपटात त्याच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. मृणाल या चित्रपटात ऋतु रिश्म नावाची भूमिका साकारताना बघावयास मिळणार आहे. 



तुमच्या माहितीसाठी ‘सुपर-३०’साठी अभिनेत्रीची निवड करण्यासाठी बराच वेळ लागला. चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी याकरिता ग्रॅण्ड आॅडिशन घेतले होते. ज्यामध्ये जवळपास १५ हजार मुलींनी आॅडिशन दिले. अखेर टीव्ही अभिनेत्री मृणालच्या पदरात ही भूमिका पडली. या चित्रपटात हृतिक रोशन प्रोफेसर आनंदकुमारची भूमिका साकारणार आहे. ज्यांच्या कोचिंग इन्स्टिट्यूट ‘सुपर-३०’ मध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी आयआयटीमध्ये प्रवेश मिळवितात. 

चित्रपटाला विशाल बहल दिग्दर्शित करीत आहेत. रिलायन्स एंटरटेनमेंट आणि फॅण्टम फिल्म्सच्या बॅनरअंतर्गत चित्रपटाची शूटिंग केली जात आहे. ‘सुपर-३०’ हा चित्रपट याच वर्षी २३ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. कदाचित तुम्हाला हे माहिती नसेल की, मृणालला या अगोदर आमिर खानच्या एका चित्रपटाची आॅफर देण्यात आली होती. आमिर खान मृणालला ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ या चित्रपटात कास्ट करू इच्छित होता. परंतु मृणालने ही आॅफर कुठलाही विचार न करता फेटाळून लावली. 

Web Title: Hrithik Roshan's wife, will become a TV actress!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.