हृतिक रोशनच्या ‘काबील’मध्ये उर्वशी रौतेलाचा ‘जलवा’
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2016 12:50 IST2016-12-14T12:50:16+5:302016-12-14T12:50:46+5:30
‘गे्रट ग्रँड मस्ती’ फेम उर्वशी रौतेला सध्या भलत्याच फॉर्म आहे. हृतिक रोशनच्या आगामी ‘काबील’ चित्रपटात ती एक आयटम नंबर ...

हृतिक रोशनच्या ‘काबील’मध्ये उर्वशी रौतेलाचा ‘जलवा’
‘ े्रट ग्रँड मस्ती’ फेम उर्वशी रौतेला सध्या भलत्याच फॉर्म आहे. हृतिक रोशनच्या आगामी ‘काबील’ चित्रपटात ती एक आयटम नंबर करणार आहे. या गाण्याची नुकतीच सोशल मीडियावर एक झलक शेअर करण्यात आली असून लवकरच संपूर्ण गाणे रिलीज केले जाणार आहे.
जुन्या हिंदी गाण्यांना रिमिक्स करून वापरण्याचा सध्या बॉलीवूडमध्ये ट्रेंड आला आहे. तो ट्रेंड फ ॉलो करत ‘काबील’मध्ये अमिताभचे लोकप्रिय गाणे ‘सारा जमाना’ नव्या रुपात सादर केले जाणार. गाण्यात लााईटबल्ब लावलेला ड्रेस घालून बिग बींनी केलेला डान्स आजही प्रेक्षकांना आठवत असेल. रिमिक्स गाण्यात त्यांच्याऐवजी उर्वशी ठुमके मारताना दिसेल.
गाण्याच्या टीझरमध्ये उर्वशी एकदम डॅझलिंग दिसत असून ग्लॅमरचा तडका लावण्यात ती यशस्वी झाली असेच म्हणावे लागेल. ३० सेकंदाच्या या टीझरमध्ये तिच्या डान्समुळे गाण्याची प्रचंड चर्चा सुरू आहे. आता पूर्ण गाणे कधी येते, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागलेले आहे.
संजय गुप्ता दिग्दर्शित या चित्रपटात हृतिक आणि यामी गौतम अंध प्रेमीयुगुलाच्या भूमिकेत असून रोनित रॉय खलनायक साकारणार आहे. काही महिन्यांपूर्वी चित्रपटाचे अॅक्शनपॅक्टड ट्रेलर रिलीज केल्यानंतर गेल्या आठवड्यात टायटल साँग ‘काबील हूं’ हे लाँच करण्यात आले. राजेश रोशन यांनी चित्रपटाला संगीत दिले आहे.
यावर्षी प्रदर्शित ‘मोहेंजदडो’च्या अपयशामुळे हृतिकला एका जबरदस्त हीट सिनेमाची गरज आहे. ‘काबील’मुळे त्याच्या करिअरला उभारी मिळेल का हे तर पुढील महिन्यात २५ तारखेला चित्रपट रिलीज झाल्यावर कळेलच.
पण त्याच दिवशी शाहरुखचा बहुप्रतीक्षीत ‘रईस’सुद्धा प्रदर्शित होणार असल्यामुळे बॉक्स आॅफिसवर जोरदार संघर्ष पाहायला मिळेल. आता या दोन्ही चित्रपटांमध्ये कोण बाजी मारणार हे पाहणे रंजक ठरेल.

This party season, get ready to groove on this magnificent and peppy number all night long. Stay tuned for #HaseenoKaDeewanaTomorrowpic.twitter.com/9PfG8P92wW— Kaabil (@FilmKRAFTfilms) 13 December 2016