ऋतिक रोशन 'क्रिश 4' मध्ये दिसणार सुपरहीरोच्या अवतारात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2017 12:12 IST2017-05-12T06:42:52+5:302017-05-12T12:12:52+5:30

ऋतिक रोशनच्या फॅन्ससाठी एका आनंदाची बातमी आहे. ऋतिक लवकरच आपल्याला क्रिश सिरीजमधल्या 4 चित्रपट घेऊऩ येणार आहे. या चित्रपटात ...

Hrithik Roshan will be seen in 'Krrish 4' in superhero epic | ऋतिक रोशन 'क्रिश 4' मध्ये दिसणार सुपरहीरोच्या अवतारात

ऋतिक रोशन 'क्रिश 4' मध्ये दिसणार सुपरहीरोच्या अवतारात

िक रोशनच्या फॅन्ससाठी एका आनंदाची बातमी आहे. ऋतिक लवकरच आपल्याला क्रिश सिरीजमधल्या 4 चित्रपट घेऊऩ येणार आहे. या चित्रपटात ऋतिक आपल्याला त्याच्याजवळ असलेल्या सुपर पॉवरचा वापर करतना दिसणार  आहे. राकेश रोशन यांनी चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम करण्यास सुरुवात केली आहे. याबाबत अजून पर्यंत कोणतीच अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. चित्रपटाची स्क्रिप्ट पूर्ण झाल्यावर यासंबंधीची घोषणा करण्यात येईल.  

ऋतिक रोशनला वंडर व्हुमन चित्रपटाचा ट्रेलर खूपच आवडला होता. त्यामुळे त्याला क्रिश 4मध्ये वंडर व्हुमन सारखी एखादी भूमिका हवी आहे. यासंदर्भात त्यांना राकेश रोशन यांनासुद्धा सांगितले आहे आता राकेश रोशन मुलाची ही इच्छा कशी पूर्ण करतात हे चित्रपट रिलीज झाल्यावर कळेल. अजून या चित्रपटात ऋतिकची अभिनेत्री कोण असणार याबाबतचा खुलासा झाला नाही आहे. क्रिश 2 आणि क्रिश 3मध्ये ऋतिकच्या हिरोइन देसीगर्ल प्रियांका चोप्रा होता. प्रियांका सध्या हॉलिवूडमध्ये बिझी आहे. मात्र नुकतीच ती काही दिवसांच्या सुट्टीवर भारतात आली होती यावेळी तिने 3 चित्रपट साइन केले आहेत. 

या 3 चित्रपटांपैकी एक चित्रपट अंतराळवीर कल्पना चावल हिच्या आयुष्यावर आधारित आहेत. या व्यतिरिक्त बाकी 2 चित्रपट कोणते याबाबतची माहिती अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे असा अंदाज लावण्यात येतोय की कदाचित क्रिश 4मध्ये ऋतिकच्या अपोझिट पुन्हा एकदा प्रियांका चोप्रा दिसू शकते. क्रिश सिरीजमधील आजपर्यंत प्रदर्शित झालेल्या चित्रपट प्रेक्षकांच्या चांगलेच पसंतीस उतरले होते. विशेषत: लहान मुलांमध्ये याची क्रेझ मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाली होती. 

Web Title: Hrithik Roshan will be seen in 'Krrish 4' in superhero epic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.