हृतिक रोशनकडे आहे या गोष्टीचा मोठा संग्रह

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2019 09:00 PM2019-03-15T21:00:00+5:302019-03-15T21:00:02+5:30

हृतिक रोशन सध्या त्याच्या एका चित्रपटातील भूमिकेवर प्रचंड मेहनत घेत आहे. आपल्या सुपर 30 या आगामी चित्रपटामध्ये तो एका दमदार भूमिकेत दिसणार आहे.

Hrithik Roshan uses new perfume for every film | हृतिक रोशनकडे आहे या गोष्टीचा मोठा संग्रह

हृतिक रोशनकडे आहे या गोष्टीचा मोठा संग्रह

googlenewsNext
ठळक मुद्देहृतिकने आपल्या पात्रानुसार प्रत्येक चित्रपटात वेगळ्या परफ्यूमचा वापर केला असल्याने त्याच्याकडे परफ्यूमचा खूपच मोठा संग्रह आहे.

बॉलिवूडचा मॅचो मॅन हृतिक रोशनचे फॅन फॉलॉव्हिंग प्रचंड आहे. त्याने कहो ना प्यार है या चित्रपटापासून त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. आजवर त्याने क्रिश, कोई मिल गया, कभी खुशी कभी गम, फिजा यांसरख्या अनेक चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. हृतिकला खऱ्या आयुष्यात काय आवडते हे जाणून घ्यायला त्याच्या चाहत्यांना नेहमीच आवडते. तुम्हाला माहीत आहे का हृतिक त्याच्या खाजगी जीवनात परफ्यूमचा खूप मोठा चाहता आहे. खूप लोकांना माहीत नसेल... पण ऋतिक आपल्या प्रत्येक पात्रांसाठी वेगळा परफ्यूम निवडतो. त्याने आतापर्यंत काम केलेल्या प्रत्येक चित्रपटातील  प्रत्येक व्यक्तिरेखेसाठी वेगळा परफ्यूम वापरला आहे. हृतिकने आपल्या पात्रानुसार प्रत्येक चित्रपटात वेगळ्या परफ्यूमचा वापर केला असल्याने त्याच्याकडे परफ्यूमचा खूपच मोठा संग्रह आहे.

हृतिक रोशन सध्या त्याच्या एका चित्रपटातील भूमिकेवर प्रचंड मेहनत घेत आहे. आपल्या सुपर 30 या आगामी चित्रपटामध्ये तो एका दमदार भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात हृतिक पटना मधील एका हुशार शिक्षकाची भूमिका साकारणार आहे. आर्थिक दृष्टीने कमकूवत असूनही आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी तो कष्ट करताना दिसणार आहे. या चित्रपटात हृतिकचे एक वेगळेच रूप प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. हृतिकने बेयर्डो नावाच्या परफ्यूमचा उपयोग त्याच्या सुपर 30 मधील अद्वितीय भूमिकेसाठी केला आहे.

हृतिक रोशन सुपर 30 मध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार असून त्याच्यासोबत या चित्रपटात मृणाल ठाकुर,अमित सदन आणि नंदीश संधू देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

‘सुपर 30’ हा चित्रपट दीर्घकाळापासून रखडला होता. या चित्रपटाचा दिग्दर्शक विकास बहल ‘मीटू’च्या आरोपात अडकला होता. त्यामुळे त्याला चित्रपटातून काढण्यात आले. यानंतर कंगना राणौतच्या ‘मणिकर्णिका - द क्वीन आॅफ झांसी’ या चित्रपटामुळे ‘सुपर 30’ रिलीज डेट बदलण्यात आली. पण आता या चित्रपटाची रिलीज डेट फायनल करण्यात आलीय. हृतिक रोशनचा हा चित्रपट येत्या २६ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

 

Web Title: Hrithik Roshan uses new perfume for every film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.