ऋतिक रोशनने सुरू केली या चित्रपटाची शूटिंग !

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2018 04:48 AM2018-01-23T04:48:46+5:302018-01-23T10:18:46+5:30

अभिनेता ऋतिक रोशनने आपला आगामी चित्रपट 'सुपर 30'च्या शूटिंगला सुरुवात केली आहे. ऋतिकने ट्विटर अकाऊंटवरुन ही माहिती दिली. ऋतिकने ...

Hrithik Roshan started the film shooting! | ऋतिक रोशनने सुरू केली या चित्रपटाची शूटिंग !

ऋतिक रोशनने सुरू केली या चित्रपटाची शूटिंग !

googlenewsNext
िनेता ऋतिक रोशनने आपला आगामी चित्रपट 'सुपर 30'च्या शूटिंगला सुरुवात केली आहे. ऋतिकने ट्विटर अकाऊंटवरुन ही माहिती दिली. ऋतिकने ट्वीट करत लिहिले आहे, सरस्वती पूजा आणि बसंत पंचमीच्या मुहूर्तावर मी माझा 'सुपर 30' च्या प्रवासाला सुरुवात करीत आहे. या चित्रपटात मी एका शिक्षकाची भूमिका साकारतो आहे. 
  गेल्या अनेक दिवसांपासून ऋतिक या चित्रपटातील भूमिकाचा अभ्यास करतो आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून  पहिल्यांदा ऋतिक शिक्षकाची भूमिका मोठ्या पडद्यावर साकारायला जातो आहे. गेल्या चार महिन्यांपासून या चित्रपटातील दुसऱ्या कलाकाराच्या कास्टिंगला सुरुवात करण्यात आली होती. ऋतिक यात गणिताचे जादूगर आनंद कुमार यांची भूमिका साकारतो आहे.  आनंद कुमार बिहारात ‘सुपर30’ नावाचा एक प्रोग्राम चालवतात. या प्रोग्रामअंतर्गत आनंद कुमार यांनी आत्तापर्यंत अनेक गरिब व होतकरू मुलांना नि:शुल्क शिकवून त्यांना आयआयटीमध्ये प्रवेश मिळवून दिला आहे. जे विद्यार्थी अतिशय हुशार आहेत परंतु आर्थिक अडचणींमुळे आयआयटीच्या परीक्षा देऊ शकत नाहीत, अशा विद्यार्थ्यांना आनंद कुमार संधी देतात. दरवर्षी भारतभर फिरून  निवडक ३० विद्यार्थी निवडून हे आनंद कुमार पाटण्याला त्यांच्या घरी आणतात. त्यांचा राहण्या खाण्यापासून ते कोचिंग आणि नंतर प्रवेश परीक्षा असा सर्व खर्च आनंद स्वत: करतात. या कामात त्यांना त्यांची पत्नी भाऊ आणि आई मदत करतात.  मिळालेल्या माहितीनुसार या चित्रपटात 78 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. जे आयआयटी जेईईच्या प्रवेश परिक्षेची तयार करतायेत. 

कास्टिंग डायरेक्टर मुकेश यांनी सांगितले की, आम्ही यात 15 ते 17 वयोगटातील मुलांची निवड केली आहे. जवळपास यासाठी आम्ही 15000 पेक्षा अधिक मुलांचे ऑडिशन घेतले. बिहार, वाराणसी, भोपाळ, दिल्ली आणि मुंबई अशा विविधा शहरातून या मुलांची निवड करण्यात आली आहे. यातून आम्ही आधी 400 मुलं निवडली मग 200 आणि त्यातून 78 मुलांची निवड केली आहे यातील शेटवच्या 30 मुलांसोबत आणि एक महिन्याची कार्यशाळा आयोजित करणार आहोत.  

Web Title: Hrithik Roshan started the film shooting!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.