Ooh, La La La! हृतिक रोशनच्या शर्टलेस फोटोवर सुजैनही झाली फिदा, म्हणाली....
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2021 16:24 IST2021-06-29T16:22:36+5:302021-06-29T16:24:16+5:30
सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असलेल्या हृतिकने आता पुन्हा असाच एक फोटो शेअर केला आहे आणि हा फोटो पाहून चाहतेच नाही तर सुजैनही फिदा झाली.

Ooh, La La La! हृतिक रोशनच्या शर्टलेस फोटोवर सुजैनही झाली फिदा, म्हणाली....
बॉलिवूडचा ‘ग्रीक गॉड’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता हृतिक रोशनच्या (Hrithik Roshan ) मस्कुलर बॉडीवर बडे-बडे फिदा होतात. सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असलेल्या हृतिकने आता पुन्हा असाच एक फोटो शेअर केला आहे आणि हा फोटो पाहून चाहतेच नाही तर सुजैनही फिदा झाली.
होय, हृतिकने त्याचा एक शर्टलेस फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला. गळ्यात स्कार्फ, डोक्यावर कॅप आणि डोळ्यांवर काळा गॉगल असा हा हृतिकाचा फोटो काहीच तासांत व्हायरल झाला.
फोटोवर अक्षरश: लाईक्स व कमेंट्सचा पाऊस पडला. यापैकी एका कमेंटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ही कमेंट होती हृतिकची एक्स-वाईफ सुजैन खान (Sussanne Khan) हिची.
‘तू २१ वर्षांचाच वाटतोय...,’ असे सुजैनने कमेंटमध्ये म्हटले आहे. अनिल कपूर यांनी देखील हृतिकच्या पोस्टवर कमेंट केली आहे.
सुजैन खान आणि अभिनेता ऋतिक रोशन 2000मध्ये विवाहच्या बंधनात अडकले होते. 2014मध्ये दोघांनी घटस्फोट घेत आपले रस्ते वेगळे केले. मात्र घटस्फोट झाल्यानंतर ही दोघांमध्ये मैत्रीचे नातं कायम राहिले. दोघांना अनेक वेळा व्हॅकेशनवर आणि बर्थ डे पार्टीमध्ये एकत्र स्पॉट करण्यात आले.
हृतिकने 2000 मध्ये ‘कहो ना प्यार है’मधून डेब्यू केल्यानंतर त्याचवर्षी लग्न केलं होतं. सुजैन आणि हृतिकची बॉन्डिंग ब-याचदा सोशल मीडियावरही पाहायला मिळते. हृतिक जेव्हा जेव्हा अडचणीत दिसतो तेव्हा सुजैनने सोशल मीडियावर त्याला सपोर्ट करताना दिसते.
हृतिकच्या वर्कफ्रंटबद्दल बोलाल तर, गेल्या वर्षी हृतिकचा ‘वॉर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात हृतिकसोबत अभिनेता टायगर श्रॉफ मुख्य भूमिकेत दिसला होता. आता लवकरच तो ‘क्रिश4’ या चित्रपटात दिसणार आहे. ‘क्रिश’ 15 वर्षे पूर्ण झाल्याच्या मुहूर्तावर त्याने या फ्रेन्चाइजीच्या चौथ्या पार्टची घोषणा केली होती.